दिल्ली: हवेची गुणवत्ता 'अत्यंत धोकादायक' पातळीवर

Delhi air pollution
Delhi air pollutionesakal
Updated on

Delhi AQI News: देशभरात दिवाळी उत्साहात साजरी झाली आहे. यंदा लसीकरणानंतर कोरोना महासाथीची भीती तुलनेने कमी असल्यामुळे नागरिकांनी आनंदाने दिवाळी साजरी केल्याचं दिसून आलं. पूजा झाल्यानंतर लोकांनी रस्त्यावर येऊन अथवा आपापल्या छतांवर फटाके वाजवल्याचं दिसून आलं. रात्री उशीरापर्यंत हे फटाक्यांचे आवाज येत होते. राजधारी दिल्ली आणि NCR मध्ये तरी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, ज्या पद्धतीन दिल्ली परिसरात फटाके उडवण्यात आल्याचं पहायला मिळालं, ते पाहता दिल्लीत खुल्या पद्धतीने नसली तरी गुपचूक पद्धतीने फटाक्यांची विक्री झाली असावी. कारण दिल्लीच्या अनेक भागात सध्या एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात AQI 1000 जवळपास पोहोचला आहे.

Delhi air pollution
गांधीजींच्या स्मरणार्थ ब्रिटनमध्ये विशेष नाणे

NCRचे बहुतांश भाग प्रदुषित

NCRमधील बहुतांश भागात वायू प्रदुषणाने टोक गाठलं आहे. फरीदाबाद, गाझीयाबाद, गुरुग्राम आणि नोयडामध्ये AQI 500 च्या पार गेला आहे. हा टप्पा अत्यंत गंभीर मानला जातो. आज सकाळी जनपथमध्ये 655.07 AQI आहे.

आज सकाळी सकाळीच संपूर्ण दिल्ली एखाद्या गॅस चेंबर बनलेली दिसून आली. अनेक लोकांच्या घशात खवखव आणि डोळ्यातून पाणी येण्याची तक्रार येत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी सायंकाळपर्यंत तरी हवेची गुणवत्ता सुधारु शकत नाही. मात्र, हवेच्या क्वालिटी कमी जास्त होऊ शकते.

Delhi air pollution
भाऊबीजेच्या गिफ्टचा ट्रेंड बदलतोय; सोने-चांदी, स्मार्ट फोन खरेदीला पसंती

बंदीमुळे फरक पडला?

भलेही दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली असो, मात्र फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये जराही कमतरता दिसून आली नाहीये. सध्या अधिकतर शहरांमध्ये AQI धोकादायक स्थितीपर्यंत पोहोचला आहे. काल झालेल्या आतिषबाजीमुळे हवेची गुणवत्ता पूर्णपणे नष्ट झाली असून वातावरण श्वास घेण्यास अयोग्य बनलं आहे. सध्या दिल्लीमध्ये वातावरण खराब झाल्यामुळे अंधुक दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()