नवी दिल्ली: भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने ISRO आज भारताचे 'आकाशातील नेत्र' म्हटल्या जाणाऱ्या GISAT-1 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण केले. पहिल्या दोन स्टेजमध्ये GSLV रॉकेट योग्य मार्गावर होते. पण तिसऱ्या स्टेजमध्ये क्रायोजेनिक इंजनमध्ये बिघाड झाला आणि GSLV-F10 EOS-03 मोहिम फसली. पहिल्या दोन स्टेजमध्ये रॉकेटची कामगिरी सामान्य होती. पण तिसरी क्रायोजेनिक अप्पर स्टेज प्रज्वलित होऊ शकली नाही.
काही तांत्रिक कारणं यामागे आहेत. त्यामुळे मोहिमेची उद्दिष्ट पूर्ण होऊ शकली नाहीत, असं इस्रोकडून सांगण्यात आलय. मिशन फेल होताच केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोचे चेअरमन डॉ. के. सिवन यांच्याबरोबर दीर्घ चर्चा केली. मोहिमेची फेरआखणी करण्यात येईल असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. अवकाश खात्याचा कार्यभार जितेंद्र सिंह यांच्याकडे आहे.
"पहिले दोन टप्पे व्यवस्थित पार पडले पण तिसरी क्रायोजेनिक अप्पर स्टेज प्रज्वलित होऊ शकली नाही. पुन्हा काही वेळाने मोहिमेची फेरआखणी करण्यात येईल" असे जितेंद्र सिंह यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. कालपासून या मिशनसाठी २६ तासाचे काऊंटडाऊन सुरु झाले होते. आज पहाटे ५.४३ च्या सुमारास सतीश धवन अवकाश तळावरुन ५१.७० मीटर उंचीचे जीएसएलव्ही रॉकेट GISAT-1 उपग्रहाला घेऊन अवकाशाच्या दिशेने झेपावले.
उड्डाणानंतर १२ मिनिटांनी दुसरा टप्पा पार झाला आणि तिसरी क्रायोजेनिक इंजिनचा टप्पा सुरु झाला. क्रायोजेनिक स्टेजमध्ये काही विसंगती आढळून आलीय. इस्रोचे GSLV-F10/EOS-03 मिशनचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही, असे चेअरमन सिवन यांनी लाइव्ह टेलिकास्ट दरम्यान सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.