कपिल सिब्बल यांच्यानंतर आता चिदंबरम यांचा काँग्रेसला उपदेशाचा डोस!

p chdanbaram
p chdanbaram
Updated on

नवी दिल्ली- बिहार विधानसभा निवडणुकीने दाखवून दिलंय की काँग्रेसचा ग्राऊंड लेव्हलला संघटनात्मक प्रभाव नाही किंवा तो खूप कमकूवत झाला आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केलं आहे. काँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी उघडपणे पक्षावर केलेल्या टीकेमुळे पक्षांतर्गत गोंधळ समोर येत असताना चिदंबरम यांचं वक्तव्य आलं आहे. काँग्रेसने बिहारमध्ये गरजेपेक्षा अधिक जागा लढवल्या, असंही चिदंबरम यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

मी गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील निकालावरुन अधिक चिंतीत आहे. या राज्यातील निकालामुळे पक्षाची संघटात्मक उपस्थिती संपली आहे किंवा ती खूपच कमकूवत झाल्याचं स्पष्ट होतं, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. कोरोना महामारीमुळे सरकारविरोधात नाराजी असताना आणि अर्थव्यवस्था घसरत असताना काँग्रेसला याचा फायदा का उठवता आला नाही, असा सवाल त्यांना मुलाखतीमध्ये करण्यात आला होता.  

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबले महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

बिहारमध्ये काँग्रेस आणि आरजेडीला जिंकण्याची संधी होती. आम्ही का हरलो याचं व्यापक पुनरावलोकन आवश्यक आहे. आम्ही राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीगड आणि झारखंडमध्ये जिंकलो होतो हे विसरुन चालणार नाही, असंही चिदंबरम म्हणाले.  ते पुढे म्हणाले की, ''बिहार निकालांनी दाखवून दिलंय की स्थानिक पातळीवर संघटना बळकट असेल तर सीपीआय-एमएल CPI-ML आणि एआयएमआयएम AIMIM सारखे छोटे पक्षही चांगली कामगिरी करु शकतात. भाजपविरोधात लढण्यासाठी संघटना तळागाळापर्यंत मजबूत हवी.''

जास्त जागा लढण्याचा काँग्रेसला तोटा झाल्याच्या प्रश्नावर चिदंबरम म्हणाले की, ''काँग्रेसने गरजेपेक्षा अधिक जागा बिहारमध्ये लढल्या. शिवाय 25 अशा जागा होत्या जेथे भाजप गेल्या 20 वर्षांपासून जिंकत आला आहे. त्यामुळे काँग्रेसने 45 जागांवरच निवडणूक लढवायला हवी होती.''

दरम्यान, कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा आहेर दिला होता. काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या समस्या आणि त्यांची उत्तरे माहित आहेत, पण काँग्रेसला ती उत्तरे शोधायच्या मार्गात येणाऱ्या अडचणींना ओळखायचेच नाहीये. आमच्यातील काहींनी आमचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी आमच्याकडे पाठ फिरवली. आणि आपण सगळे त्याचे परिणाम पाहतोय. फक्त बिहारमधीलच नव्हे तर देशातील लोक जिथे कुठे पोटनिवडणुका होतायत तिथे काँग्रेसला एक चांगला पर्याय म्हणून पाहिलं जात नाही, असं ते म्हणाले होते. 

(edited by- kartik pujari)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.