Governor News : राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्यावर विनयभंगाचे आरोप करणाऱ्या महिलेला कथितपणे अडवल्याबद्दल राजभवनातील तीन अधिकाऱ्यांविरोधा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी शनिवारी याप्रकरणाची माहिती दिली. पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे मागच्या काही दिवसांपासून राज्यपालांवरच्या कथित आरोपांचं प्रकरण गाजत आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, राजभवनातील एक कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने विनयभंगाच्या प्रकरणात कोर्टासमोर आपला जबाब नोंदवला होता. त्यानंतर हेयर स्ट्रीट पोलिस ठाण्यात तीन अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.
२ मे रोजी एका महिलेने राज्यपाल बोस यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी तपास सुरु केला. संविधानाच्या अनुच्छेद ३६१ नुसार राज्यापालांविरोधात त्यांचा कार्यकाळ सुरु असताना कोणतीही फौजदारी कारवाई करता येत नाही.
दरम्यान, या प्रकरणात राजभवनने आरोप फेटाळून लावले आहेत. राज्यपालांची बदनामी करण्याचा डाव असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. खोट्या आरोपांना मी घाबरणार नाही, माझी बदनामी करुन निवडणुकीत फायदा करुन घेण्याचा डाव आहे, असा पलटवार राज्यपालांनी केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.