Kajal Hindustani: नुपूर शर्मानंतर आता काजल हिंदुस्तानी! हेटस्पीचमुळं राम नवमीला उसळली दंगल, कोठडीत रवानगी

शोभायात्रेत या महिलेनं भडकाऊ भाषण केल्यानं ही दंगल उसळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
Kajal Hindustani
Kajal Hindustani
Updated on

नवी दिल्ली : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या भडकाऊ भाषणानंतर आता हिंदुत्ववादी कार्यकर्ती काजल हिंदुस्तानी अशाच प्रकरणात चर्चेत आली आहे. काजल हिंदुस्तानीनं राम नवमीवेळी केलेल्या भाषणामुळं गुजरातमध्ये दंगल उसळल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या महिलेला पोलिसांनी हेटस्पीच प्रकरणी अटक केली असून कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळं दिवसभर सोशल मीडियामध्ये नुपूर शर्मा आणि काजल हिंदुस्तानी या दोघीही ट्रेडिंगमध्ये होत्या. (After Nupur Sharma now Kajal Hindustani arrested riot broke out on Ram Navami due to hate speech)

Kajal Hindustani
प्रवाशाची क्रू मेंबरला मारहाण! Air Indiaचं दिल्ली-लंडन विमान अर्ध्यातूनच परतलं

काजल हिंदुस्तानी या महिलेनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं की, "आज देशात कोणी हिंदूनं श्वास जरी घेतला तरी लोकांना ते हेटस्पीच वाटतं. 'लढून पाकिस्तान मिळवला आणि हसत हसत हिंदुस्तान घेऊ' या गोष्टीचं त्यांना वाईट वाटताना हिंदू आपल्याच देशात का राहत आहेत? असंही त्यांना वाटतं. त्या लोकांना हिंदू काफीर वाटतात. पीएफआयची योजना होती की, २०४७ पूर्वी भारताला इस्लामिक राष्ट्र बनवलं जावं"

Kajal Hindustani
Vivek Agnihotri: दिग्दर्शक विवेक अग्नहोत्री यांची बनशर्त माफी! हायकोर्टानं समज देत केलं दोषमुक्त

का झाली अटक?

काजल हिंदुस्तानी या महिलेच्या अटकेचं प्रमुख कारण म्हणजे राम नवमीच्या दिवशी तीनं केलेलं विधान. उना इथं राम नवमीनिमित्त आयोजित शोभायात्रेत काजल हिंदुस्तानी गेली होती. या कार्यक्रमात सुमारे ३० हजार लोक होते. यावेळी भाषणात काजलनं 'लव्ह जिहाद', 'लँड जिहाद'सह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यानंतर ती पोलिसांच्या निशाण्यावर आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()