नवी दिल्ली : बदनामी प्रकरणात शिक्षा झाल्यामुळं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आपली खासदारकी आणि सरकारी निवासस्थान गमवावं लागलं होतं. पण सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थिगिती मिळाल्यानं त्यांना काल खासदरारी पुन्हा बहाल करण्यात आली.
त्यानंतर आज सरकारी निवासस्थानही देण्यात आलं आहे. त्यामुळं पूर्वी राहत असलेल्या '12 तुघलक लेन' याच ठिकाणी राहुल गांधी पुन्हा वास्तव्यास येणार आहेत. (After revival of MP post Rahul Gandhi got Official Home again)
दरम्यान, पुन्हा घर मिळाल्यानंतर राहुल गांधींनी यावर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आसाम काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठकीसाठी काँग्रेसच्या हेडक्वार्टरला जात असताना त्यांना वाटतेच माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रियेसाठी अडवलं. यावेळी त्यांनी 'संपूर्ण भारतच माझं घर आहे,' असं म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीवेळी कर्नाटकात प्रचार सभेदरम्यान मोदी आडनावावरुन टीका केली होती. देशाला चुना लावून फरार झालेले नीरव मोदी, ललित मोदी यांचा उल्लेख करताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. पण हेच विधान राहुल गांधींना भोवलं होतं. दोन वर्षांनंतर गुजरातमधील भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात गुजरातमधील स्थानिक कोर्टात याचिका दाखल केली होती.
यावर कोर्टानं निकाल देत राहुल गांधींना बदनामी फौजदारी प्रकरणात दोषी ठरवत जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधी दोषी ठरल्यानं नियमानुसार लोकसभा सचिवालयानं तातडीनं राहुल गांधींची खासदारकी रद्दबातल ठरवली. सदस्यत्व गमावल्यानं त्यांचं सरकारी निवासस्थानही काढून घेण्यात आलं होतं.
दरम्यान, सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात याविरोधात अपिल केलं होतं. पण हायकोर्टानं राहुल गांधींना दिलासा देण्यास नकार देत सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता. त्यानंतर राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान कोर्टानं सत्र न्यायालयाच्या निकालावरुन बरेच प्रश्नही उपस्थित केले. राहुल गांधींनी जास्तीत जास्त शिक्षा १ वर्षे ११ महिन्यांची शिक्षाही देता आली असती पण दोन वर्षांचीच शिक्षा का दिली? यामुळं लोकप्रतिनिधी असलेल्या राहुल गांधींना खासदारकी गमवावी लागली.
त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जीवनात सांभाळून बोलावं असा सल्लाही यावेळी सुप्रीम कोर्टानं दिला. तसेच राहुल गांधींच्या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली. पण प्रोटोकॉलनुसार, सुप्रीम कोर्टानं शिक्षेला स्थगिती दिल्यानं राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार काँग्रेसच्या अर्जानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांना पुन्हा लोकसभा सदस्यत्व बहालं केलं. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी त्यांना निवासस्थानही देण्यात आलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.