बाकामधे शनिवारी पार पडलेल्या एका लग्नाविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू आहे.(Viral Video)या लग्नाची एवढी चर्चा होण्यामागचं कारणही तसंच खास आहे.कारण साधारणत: लग्न म्हटलं की महिन्याभऱ्यापासून या सोहळ्याची तयारी सुरू (Police Constable)असते.मुहूर्त,लग्नाच्या जागेची उपलब्धता या सगळ्यांची सांगड घालत अखेर लग्नाची तारीख ठरत असते.मात्र हे लग्न जरा वेगळं होतं.मुहूर्त आणि वरातीशिवाय बाका कोर्ट परिसरातील एका मंदिरात हे लग्न लावण्यात आलं.
हे लग्न खरं तर एसपी डॉ. सत्यप्रकाश यांच्या आदेशानुसार लावण्यात आलं.भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंज मधील पोलीस शिपाई मिथिलेश पासवान आणि रामपूरची करिष्मा कुमारी यांचं सहा वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं.(Love Marriage)दरम्यान लग्नाचा विषय निघताच मिथिलेशने करिष्माला लग्नासाठी नकार दिला.नकार देताच करिष्माने थेट एसपींना तक्रार केली.या प्रकरणाची दखल घेत एसपींनी लगेच या पोलीस तरूणाला ठाण्यात बोलावून घेतलं.आणि ऑन द स्पॉट लग्न करण्याचा निर्णय दिला.
त्यानंतर मिथिलेश आणि करिष्माचं जवळच्या मंदिरात नेऊन लग्न करून देण्यात आलं.या लग्नाआधी शुभ मुहूर्त बघितला गेलेला नव्हताच.शिवाय या लग्नाला साक्षीदार म्हणून काही पोलीस सहकारी आणि स्थानिक लोकं उपस्थित होते.
मिथिलेश हा महेशी गावचा रहिवासी आहे.याच गावात करिष्माची मावशी देखिल राहात होती.तिथेच यांची एकमेकांशी भेट झाली.मागल्या अनेक महिन्यांपासून मिथिलेश लग्नासाठी नकार देत होता.तसेच पंधरा दिवसांपासून करिष्माचे कुटुंब त्याला लग्नासाठी विणवण्या करत होते.पण त्याने कोणाचेच ऐकले नाही.अखेर एसपींनी दिलेल्या निर्णयानंतर थेट ऐन वेळी या जोडप्याचं पोलीस सहकाऱ्यांच्या उपस्थित लग्न झालं.त्यांच्या या अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.