Foxconn Company : तमिळनाडूनंतर फॉक्सकॉन कर्नाटकात गुंतवणार तब्बल पाच हजार कोटी; 'इतक्या' लोकांना मिळणार रोजगार

दोन प्रकल्पांमुळे राज्यातील 13 हजार लोकांना रोजगाराच्या संधी होणार उपलब्ध
Foxconn Taiwanese Company
Foxconn Taiwanese Companyesakal
Updated on
Summary

चेन्नई येथे कर्नाटक सरकार आणि फॉक्सकॉनच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळातर्फे यासंदर्भातील लेटर ऑफ इंटेंटवर स्वाक्षरी केली.

बंगळूर : तैवानी कंपनी फॉक्सकॉन (Foxconn Taiwanese Company) कर्नाटकमध्ये आयफोनचे (Karnataka iPhone) सुटे भाग आणि सेमीकंडक्टर उपकरण उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या दोन प्रकल्पांमुळे राज्यातील १३ हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

तमिळनाडूमध्ये १६ हजार कोटींची गुंतवणुकीच्या घोषणेपाठोपाठ फॉक्सकॉनने कर्नाटकमध्येही मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे. नुकताच चेन्नई येथे कर्नाटक सरकार आणि फॉक्सकॉनच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळातर्फे यासंदर्भातील लेटर ऑफ इंटेंटवर स्वाक्षरी केली.

Foxconn Taiwanese Company
Pune Metro : साताऱ्याच्या पोरीनं PM मोदींसमोर चालवली Metro! दडपण, काहूर, अपेक्षांचं ओझं पण..

यावेळी कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील, ग्रामीण विकासमंत्री प्रियांक खर्गे यांच्यासह फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ, कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हे दोन प्रकल्प राज्याच्या आर्थिक वाढीसाठी आणि हजारो कुशल व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील, असे उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी यावेळी सांगितले.

Foxconn Taiwanese Company
Foxconn Taiwanese Companyesakal
Foxconn Taiwanese Company
K Chandrasekhar Rao : 'दलितांनी किती वर्षे संघर्ष करायचा? बराक ओबामाला अध्यक्ष करून त्यांनी पापक्षालन केलं'

राज्याचे अनुकूल व्यावसायिक वातावरण, त्याच्या कुशल मनुष्यबळ यामुळे भारतातील आमच्या विस्तार योजनांबाबत आम्ही उत्साही आहोत, असे फॉक्सकॉनचे चेअरमन यंग लिऊ यांनी म्हटले आहे. फॉक्सकॉनची उपकंपनी आयफोन एन्क्लोजर प्रकल्पासाठी तीन हजार कोटी रुपये गुंतवणार असून, त्याअंतर्गत १२ हजार लोकांना रोजगार मिळेल, तर अप्लाइड मटेरिअल्स कंपनीच्या सहकार्याने सेमीकंडक्टर निर्मितीच्या सेमीकॉन प्रकल्पासाठी दोन हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

Foxconn Taiwanese Company
Lok sabha Election 2024: ठरलं! महादेव जानकर CM योगींच्या राज्यातून लढवणार लोकसभा निवडणूक? 'या' मतदारसंघातूनही आजमावणार नशीब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.