ट्विटरनंतर राहुल गांधींचं इन्स्टाग्राम अकाउंटही ब्लॉक होणार?

Rahul Gandhi
Rahul Gandhi
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं ट्विटर अकाउंट (Twitter) लॉक करण्यात आलं होतं तसेच काही काळासाठी त्यांचं ब्लू टीक देखील हटवण्यात आलं होतं. या घटनेनंतर मोठा गदारोळ पहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी आज याबाबत मौन सोडलंय. माझे खाते बंद करून ट्विटर देशाच्या राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करीत असून, ते तटस्थ न राहता पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. ‘ट्विटर’ने मात्र नागरिकांची व्यक्तिगत गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई केल्याचा खुलासा केला आहे. या एकूण प्रकरणासंदर्भात आता राहुल गांधींच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. ट्विटरसोबत चाललेल्या या वादादरम्यानच आता राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (NCPCR) राहुल गांधींच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे. आयोगाचं म्हणणं आहे की, राहुल गांधींनी बलात्कार पीडितेची ओळख उघड करत पोक्सो कायद्याचं उल्लंघन केलंय. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई व्हायला हवी. आयोगाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला यासंदर्भात एक पत्रदेखील लिहलंय. (After Twitter NCPCR demands action against Instagram profile of Rahul Gandhi)

Rahul Gandhi
लस घेऊनही देशात किती जणांना झाला कोरोना? जाणून घ्या

फेसबुकला पत्र लिहून NCPCR ने म्हटलंय की, त्यांनी राहुल गांधींच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक व्हिडीओ पाहिलाय ज्यामध्ये एका बलात्कार पीडित मुलीच्या आई-वडिलांची ओळख उघड करण्यात आली आहे, जे थेट कायद्याचं उल्लंघन आहे.

इन्स्टाग्राम अकाउंटही ब्लॉक होणार?

पीडित बालिकेच्या कुटुंबीयांचा फोटो ट्विट केल्यानंतर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटरकडे कारवाईची मागणी केली होती. त्याच प्रमाणे या आयोगाने आता फेसबुकलाही पत्र पाठविले आहेत. त्यात राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर बालिकेच्या कुटुबीयांचा फोटो अपलोड केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. बालिकेच्या कुटुंबीयाचे छायाचित्र प्रसिद्ध करणे हे कायद्याचा भंग करणारे असल्याने त्यावर कारवाई करावी, अशी मागणी आयोगाने केली आहे. यामुळे राहुल यांचे इन्स्टाग्राम अकाउंट देखील ब्लॉक केले जाण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi
Tamilnadu Budget: 3 रुपये स्वस्त पेट्रोल, महिलांनाही खूशखबर

दिल्लीत बलात्कार झालेल्या नऊ वर्षांच्या मुलीच्या कुटुंबीयासमवेतचा फोटो राहुल गांधी यांनी ‘ट्विटर’वर पोस्ट केला होता. त्यानंतर ट्विटरने त्यांचे खाते ब्लॉक केले. त्यापाठोपाठ अनेक नेत्यांचे अकाउंट ब्लॉक केले आहेत. यामुळे संतापलेल्या राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरलाच लक्ष्य केले. माझ्या असंख्य चाहत्यांचा मत व्यक्त करण्याचा अधिकार ट्विटरने नाकारला आहे. देशाच्या लोकशाही व्यवस्थेवरील हा हल्ला आहे, अशी टीका त्यांनी केली. माझे ट्विटर खाते बंद करून ते देशाच्या राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करीत आहोत. त्यांनी केवळ माझे खातेच बंद केले नाही, तर लाखो लोकांची मुस्कटदाबी केली आहे. एक व्यापार करणारी कंपनी आता राजकारण ठरविण्याचे काम करीत आहेत. त्यांचे हे कृत्य म्हणजे ट्विटर हे तटस्थ व्यासपीठ नसून पक्षपाती असल्याचे सिद्ध करीत आहे,’’ असे ते म्हणाले.

आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. माध्यमावर ते नियंत्रण ठेऊन आहेत. त्यामुळे एका ट्विटच्या माध्यमातून आमची भूमिका मांडू शकत होतो. परंतु ते देखील पक्षपाती भूमिका घेत आहेत. सध्याचे सरकार जे सांगतील, तेच ट्विटर ऐकत आहे. राजकीय बाबींमध्ये त्यांनी तटस्थ राहायला हवे. कारण त्यात कुणाची बाजू घेण्याचे परिणाम त्यांना भोगावे लागू शकतात, अशी इशारा राहुल यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.