CPI Candidates Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. त्यानंतर आणखी एक बातमी येत असून झारखंडमध्ये एका पक्षाने इंडिया आघाडीची साथ सोडली आहे. त्यामुळे झारखंड राज्यामध्ये आगामी निवडणुकीची गणितं बदलली आहेत.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष अर्थात CPI ने झारखंडमध्ये इंडिया आघाडीतून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. १४ पैकी ८ जागांवर आम्ही एकटे निवडणूक लढवणार आहोत, असं पक्षाने रविवारी जाहीर केलं.
झारखंडमधून लोकसभेत सीपीआयचा एकही सदस्य नाही. पक्षाचे प्रदेश सचिव महेंद्र पाठक यांनी 'पीटीआय'शी संवाद साधताना म्हटलं की, आम्ही स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे, पण अजूनही काँग्रेसने जागावाटपावर चर्चा केली नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
१६ तारखेला उमेदवारांची घोषणा होणार
महेंद्र पाठक पुढे म्हणाले की, झारखंड प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. रांची, हजारीबाग, कोडरमा, चतरा, पलामू, गिरीडीह, दुमका आणि जमशेटपूर या जागांवर सीपीआय उमेदवार देणार आहे. उमेदवारांची घोषणा १६ मार्च किंवा त्यानंतर करण्यात येईल.
त्यातच झारखंड मुक्ती मोर्चाने म्हटलंय की, सीपीआयच्या प्रदेश कार्यकारिणीचा हा निर्णय पक्षांतर्गत शिस्तीवर प्रश्न उपस्थित करणारा आहे. झामुमोचे प्रवक्ते मनोज पांडेय यांनी म्हटलं की, सीपीआयने असा निर्णय घेतल्याने आश्चर्य वाटतंय. जागावाटपावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरु आहे. तरीही असा निर्णय घेणं दुर्दैवी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.