Taj Mahal Video : 'तेजोमहल' म्हणत ताजमहालात घुसले दोन तरुण, गंगाजल शिंपडून बनवला व्हिडीओ, CISF ने केली अटक

Taj Mahal Controversy : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहालमध्ये २ तरूणांनी गंगाजल अर्पण केल्याची घटना घडली आहे.
Taj Mahal Video
Taj Mahal Videoesakal
Updated on

Taj Mahal Video : जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश असलेला ताजमहाल भारताचे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. नुकतीच, या ताजमहालात एक विचित्र घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये स्थित असलेल्या आग्रा येथील ताजमहालमध्ये २ तरूणांनी गंगाजल अर्पण केले आहे. हे दोन तरूण शनिवारी गंगाजल अर्पण करण्यासाठी ताजमहालमध्ये पोहोचले.

त्यानंतर, ताजमहालातील मुख्य मकबराजवळ स्थित असलेल्या दरवाज्यावर गंगाजल अर्पण केले. या तरूणांचा गंगाजल अर्पण करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. दरम्यान, अखिल भारत हिंदू महासभेने, असा दावा केला आहे की, तेजोमहालय शिवमंदिरात गंगाजल अर्पण करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे हे गंगाजल अर्पण करताना व्हिडिओ काढण्यात आला, त्यानंतर, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील करण्यात आला.

Taj Mahal Video
Supreme Court : समलिंगी पुरुष,ट्रान्सजेंडर व्यक्ती अन् SEX वर्कर्स यांना रक्तदान करण्यास बंदी का? सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस

दरम्यान, या प्रकरणी पोलिस उपायुक्त सूरज राय यांनी सांगितले की, ते २ तरूण ताजमहालात भेट देण्यासाठी आले होते. ताजमहालात आल्यानतंर त्यांनी प्लॅस्टिक बॉटलमधून पाणी सांडवले होते. त्यांचे हे कृत्य पाहून त्या तरूणांना सीआयएसएफने (CISF) ताब्यात घेतले. या प्रकरणी आता ताजगंज पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, त्या तरूणांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

अखिल भारत हिंदू महासभेचे प्रवक्ते संजय जाट या प्रकरणी म्हणाले की, 'महासभेचे २ बब्बर शेर विनेश चौधरी आणि श्याम यांनी तेजोमहालयात गंगाजल अर्पण केले आहे. हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. हा ताजमहल नसून हा तेजोमहालय आहे. जिथे भविष्यात आपण कावड वाहून भगवान शिवाला गंगाजलाने अभिषेक करत राहू', असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

Taj Mahal Video
Delhi Coaching Centre : कोचिंग सेंटर दुर्घटनेचा तपास ‘सीबीआय’कडे ; पोलिस, महापालिकेवरही दिल्ली उच्च न्यायालयाचे ताशेरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.