अहमदाबादच्या पश्चिम भागात राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या १३ वर्षांच्या मुलीच्या हातातुन मोबाईल हिसकावला, त्यानंतर रागावलेल्या मुलीने आपल्या आईची हत्या करण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीचे हे कारस्थान उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. हा खुलासा झाल्यानंतर पालकांनी गुजरात पोलिसांच्या हेल्पलाइन अभयमला फोन करून मदत मागितली. (Latest Marathi News)
मुलीने आईचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा राग मनात धरून तिला इजा करायची होती, अशी माहिती समोर आली आहे.
बाथरूममध्ये घसरून पडेल असे पदार्थ जमिनीवर पडलेले दिसले तर साखरेच्या डब्यातून कीटकनाशक पावडर आणि फिनाईलसारखे द्रव आढळले. या 13 वर्षीय मुलीच्या आईने कीटकनाशके असलेली साखर खावी किंवा निसरड्या जमिनीवर घसरून पडावे आणि डोक्याला दुखापत व्हावी अशी तिची इच्छा होती. (Latest Marathi News)
काही दिवसांपूर्वी आईने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला होता आणि तो परत देण्यास नकार दिला होता. तेव्हापासून ही मुलगी हिंसक झाली होती, असे अभयम १८१ महिला हेल्पलाइनच्या समुपदेशकाने सांगितले आहे.(Latest Marathi News)
आईने पहिल्यांदा या गोष्टींकडे दुर्लक्ष केले, पण नंतर जेव्हा तिला समजले की 13 वर्षांच्या मुलीचे कारस्थान आहे. त्यानंतर आईने मुलीला समजावले त्यानंतर काही दिवस त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले, मात्र त्यांच्या मुलीमध्ये सुधारणा न झाल्याने अखेर त्यांनी अभयम हेल्पलाइनची मदत घेतली.
महिला हेल्पलाइन अभयम 181 च्या समुपदेशकाने मुलीशी संवाद साधला असता धक्कादायक बाब समोर आली. 13 वर्षाची मुलगी इतकी क्रूर कशी असू शकते. हे आकलना पलीकडचे आहे. समुपदेशकाने सांगितले की, मुलीशी बोलल्यानंतर आम्हाला समजले की तिला तिच्या आई-वडिलांचे नुकसान करायचे होते.
मुलीची इच्छा होती की, तिच्या पालकांनी कीटकनाशकयुक्त साखर खावी किंवा निसरड्या जमिनीवर पाऊल ठेवावे आणि पडून डोक्याला दुखापत व्हावी. मुलीच्या आईने काही दिवसांपूर्वी तिच्याकडून फोन घेतला होता आणि तो परत करण्यास नकार दिल्याचे समुपदेशनात उघड झाले. तेव्हापासून मुलगी असे हिंसक वर्तन करत आहे.(Latest Marathi News)
अभयमच्या समुपदेशकाच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या पालकांनी आम्हाला सांगितले की, ती तिचा वेळ मित्रांसोबत ऑनलाइन चॅट करण्यात आणि सोशल मीडियावरील रील्स आणि पोस्ट्स पाहण्यात घालवते. त्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर आणि सामाजिक जीवनावर होत होता. मुलीला असे पाहून आई-वडिलांना आश्चर्य वाटले.(Latest Marathi News)
ती इतकी पुढे जाईल असे वाटले नव्हते. समुपदेशकाने सांगितले की, या जोडप्याच्या मुलीचा जन्म लग्नाच्या 13 वर्षांनंतर झाला, त्यामुळे त्यांनी तिच्या संगोपनात कोणतीही कसर सोडली नाही, नेहमीच तिची काळजी घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.