Ahmedabad : उत्साहाला अपेक्षांची झालर,विश्वकरंडक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला

अहमदाबादचा भव्यदिव्य रंगमंच नटून थटून तयार
Ahmedabad
Ahmedabad esakal
Updated on

अहमदाबाद : ज्या क्षणाची वाट जवळपास दीड महिना पाहिली गेली तो क्षण आता काही तासांवर आला आहे आणि त्याासाठी अहमदाबादचा भव्यदिव्य रंगमंच नटून थटून तयार आहे. अवकाश पडदा उघडण्याचा, परंतु त्या अगोदरच संपूर्ण अहमदाबाद शहरात कमालीचा उत्साह संचारला आहे.

वानखेडे स्टेडियमवर मोहम्मद शमीने न्यूझीलंडच्या अखेरच्या फलंदाजाला बुधवारी बाद केले आणि त्यावेळी मुंबईत वाजलेल्या फटक्यांचा आवाज येथे अहमदाबादमध्ये उमटला आणि त्या क्षणापासून येथील वातावरण कमालीचे बदलू लागले. ‘चलो अहमदाबाद’ असा नारा देत असंख्य क्रिकेटप्रेमींनी अंतिम सामन्यास येण्याची तयारी सुरु केली आणि बघत बघता शुक्रवारीच हे शहर जवळपास हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र निर्माण झाले.

Ahmedabad
Hair Care Tips : हिवाळ्यात कलर केलेल्या केसांची अशी घ्या काळजी, फॉलो करा ‘या’ टिप्स

दिवाळीच्या सुटीचा हँगओव्हर अजूनही असल्याने एरवी असलेली वाहतूक कोंडी नव्हती, परंतु रेल्वे, रस्ते महामार्ग आणि विमानतळांवरची गर्दी मात्र वाढली. येथे येणारा प्रत्येक जण अंतिम सामन्यासाठीच जणू काही येत आहे असे समजून येथील स्थानिक वाहतूकदारांनी चढ्या भावाचे ‘रेडकार्ड’ तयार केले. हॉटेलच्या दरांनी तर उच्चांक गाठला. लाखांच्या वर हॉटेलचे भाडे आणि २० हजारांच्यावर विमान प्रवासाचे भाडे, असे सुगीचे दिवस भारत-पाक सामन्यानंतर या अंतिम लढतीने आणले आहेत.

Ahmedabad
Weight Loss Tips : डेअरी प्रोडक्ट खाऊन वजन वाढणार नाही तर कमी होणार, सुटलेली ढेरी कमी करण्याचा हा आहे बेस्ट फॉर्म्युला

एक लाख ३२ हजार क्षमता असलेल्या या स्टेडियमची तिकीटविक्री कधीच संपलेली आहे. तरीही येथील अनेक स्थानिकांनीही आशा सोडलेली नाही. भारतीय संघातील मोजके खेळाडू हलक्या सरावासाठी आज मैदानात आले. तर कोलकत्याहून अहमदाबादमध्ये आलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टेडियममध्ये आलेच नाहीत. तरीही स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उत्साही प्रेक्षकांचा गलका वाढतच होता. त्यात भर होती पोलिसांची. १० ते १५ हजार पोलिस आजपासूनच स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत. जवळपास महिनाभरापूर्वी १५ ऑक्टोबरलाही भारत-पाक सामन्याच्यासाठी अशीच परिस्थिती होती. पण ती मोहीम फत्ते केल्यानंतर आत्ताच्या उत्साहाला विजेतेपदाच्या अपेक्षांची झालर लागली आहे.

Ahmedabad
Winter Tips: थंडीच्या दिवसांत चुकूनही खाऊ नका या गोष्टी; बिघडू शकते आरोग्य

नरेंद्र मोदी, शहा यांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे रविवारच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच विजेतेपदाचा करंडक पंतप्रधान देणार असल्याचेही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

Ahmedabad
Skin Care Tips: हिवाळ्यात मऊ त्वचा ठेवण्यासाठी कसा कराल मधाचा वापर? जाणून घ्या

विजेत्या कर्णधारांनाही निमंत्रण

विश्वकरंडक विजेते कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांच्यापासून ऑईन मॉर्गनपर्यंत सर्व कर्णधारांना अंतिम सामन्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. श्रीलंकेचे विजेते कर्णधार अर्जुन रणतुंगा हे उपस्थित राहतील का, याबाबत शंका आहे. त्यांनी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यावर काही दिवसांपूर्वीच टीका केली होती, आज त्याबद्दल श्रीलंका मंडळाने जय शहा यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली.

Ahmedabad
Health Tips : लवकर म्हातारे व्हायचं नसेल तर भोपळा खा, डिप्रेशनपासूनही वाचवतो अन् ताजेपणा देतो

अहमदाबादमध्ये एकूण कामगिरी

भारत ऑस्ट्रेलिया

सामने

१९ ६

विजय

११ ४

पराभव

८ २

प्रथम फलंदाजीत विजय

५ ३

धावांचा पाठलाग करताना विजय

६ १

सर्वाधिक धावसंख्या

३२५ २८६

नीचांकी धावसंख्या

१०० १४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.