महिलेबरोबर 'सेक्सटॉर्शन'चा प्रकार, व्हॉट्सअ‍ॅप कॉल महाग पडला

त्याचे वर्तन पाहून ती महिला हादरुन गेली.
Sex racket.jpg
Sex racket.jpg
Updated on

अहमदाबाद: सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून परिचित नसलेल्या व्यक्तीशी ओळख करणं आणि पुढे त्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत (friendship) करणं महाग पडू शकतं. सोशल मीडियावरुन झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन फसवणूक (cheating) करण्याचे अनेक गुन्हे आतापर्यंत घडले आहेत. ही फसवणूक आर्थिक किंवा शारीरिक शोषण अशा प्रकारची असू शकते. असे प्रकार दररोज देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात घडत असतात. (Ahmedabad woman cheated by fake person on whatsapp call)

आता गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक महिला 'सेक्सटॉर्शन'ची पीडित ठरली आहे. पीडित महिला आयटी सेक्टरमध्ये चांगल्या हुद्दयावर नोकरीला आहे. वर्षभरापूर्वी सोशल मीडियावरुन तिची एक व्यक्ती बरोबर मैत्री झाली. त्याने आपण अधिकारी पदावर असल्याचे सांगितेल. पुढे एकदिवस या मैत्रीमुळे आपण 'सेक्सटॉर्शन'चे बळी ठरु, अशी कल्पनाही त्या महिलेने केली नसेल.

Sex racket.jpg
घटस्फोटासाठी कोर्टात गेला, सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू

"डिसेंबरमध्ये आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेशी ओळख केली. आपण अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. पाच महिने चॅटिंग करुन त्याने महिलेचा विश्वास संपादन केला व तिचा फोन नंबर मिळवला. त्यानंतर त्यांच्यात व्हॉट्स अ‍ॅप वरुन चॅटिंग सुरु झाले" असे अहमदाबाद गुन्हेशाखेतील पोलिसाने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

Sex racket.jpg
हाजीकासममधील सदनिकांच्या वादावर जितेंद्र आव्हाड म्हणाले...

"एक दिवस त्याने महिलेला रात्रीच्या वेळी आपल्याला व्हिडिओ कॉल करायचा आहे असे सांगितले. इतके महिने चॅटिंग सुरु असल्याने तिचा विश्वास बसला होता. ती तयार झाली. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने तिला व्हॉट्स अ‍ॅपवर व्हिडिओ कॉल केला. त्याने अचानक अश्लील बोलायला व स्वत:चे कपडे काढायला सुरुवात केली. आरोपीने महिलेला सुद्धा तशीच कृती करायला सांगितली. त्याचे वर्तन पाहून ती महिला हादरुन गेली. तिने तो कॉल कट केला. त्यानंतर त्या माणसाने महिलेला व्हिडिओ कॉलच्या रेकॉर्डिंगचा स्क्रिनशॉट पाठवला" असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. या स्क्रिनशॉटच्या आधारे त्याने ब्लॅकमेलिंग सुरु केले. त्याने महिलेकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. पीडित महिलेने तडक पोलसी ठाणे गाठले. पोलिसांनी तिला पैसे न देण्याचा व फोन नंबर ब्लॉक करण्याचा सल्ला दिला. आता तिला धमक्या येणे बंद झाले आहे. समाजात बदनामी होईल या भीतीपोटी त्या महिलेने तक्रार नोंदवली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.