Ahmednagar Name Changed : अहमदनगरचा अहमद मूळचा ब्राह्मण होता ? जाणून घ्या अहिल्यानगरचा इतिहास

देशातील अनेक शहरांची नावं बदलण्याचा ट्रेंड सध्या सुरू
Ahmednagar Name Changed
Ahmednagar Name Changedesakal
Updated on

Ahmednagar Name Changed : देशातील अनेक शहरांची नावं बदलण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव देण्याची घोषणा केली होती.

Ahmednagar Name Changed
Railway Accident History : ९ रेल्वे अपघात ज्यांनी संपूर्ण देशाला हादरवलं; जाणून घ्या भीषण अपघातांचा इतिहास

आता उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही काही शहरांच्या नामांतराचा घाट घातला जातोय. अहमदनगर जिल्ह्याचे नाव आता अहिल्यानगर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली.

अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. यापूर्वी महाराष्ट्रातील औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धारशिव करण्यात आले आहे.

Ahmednagar Name Changed
Odisha Train Accident : २३३ जणांचा जीव घेणारा तीन रेल्वेंचा अपघात नेमका झाला कसा? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

अहिल्याबाई होळकर कोण होत्या?

अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगरच्या चोंडी गावात ग्रामप्रमुख माणकोजी शिंदे यांच्या घरी झाला. तेव्हा माणकोजी शिंदे यांनी आपल्या मुलीला शिक्षण मिळावे अशी प्रतिज्ञा घेतली होती. त्या काळात मुलींचे शिक्षण फारच कमी होते.

Ahmednagar Name Changed
Odisha Train Accident: केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे रेल्वे अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, मृतांची संख्या 233 तर...

पेशवा बाजीरावांचे सेनापती मल्हारराव होळकर आठ वर्षांच्या अहिल्याबाईंना मंदिरात पाहिले होते. अहिल्याबाईंची भक्ती आणि तिचा साधेपणा पाहून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांचा मुलगा खंडेराव याच्याशी लग्न लावून द्यायचा निर्णय घेतला.

Ahmednagar Name Changed
Odisha Train Accident : मृत्यूचं तांडव! ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 233, तर 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी

कुशल प्रशासक आणि धैर्यवान स्त्री

अहिल्याबाई होळकर यांच्या शौर्याचा देशाचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनीही दाखला दिला होता. पं. नेहरूंनी लिहिले "होळकरांची तीस वर्षे (1765-1795) राजवट महान कामगिरीने भरलेली होती. या काळात शासनाची व्यवस्थापन यंत्रणा चांगलीच होती. होळकर सरकारच्या कौशल्याने लोक समृद्ध झाले. त्या एक अतिशय सक्षम शासक आणि संघटक होत्या. त्यांच्या हयातीत त्यांचा खूप आदर होता."

Ahmednagar Name Changed
Coromandel Express Train Accident : 2016 नंतरचा सर्वात मोठा रेल्वे अपघात, रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

मंदिरांचा जीर्णोद्धार

होळकर राजवटीचा काळ हा हिंदू मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा काळ मानला जातो. अहिल्याबाईंच्या योगदानाने अनेक मंदिरांची देखभाल झाली. 1754 मध्ये भरतपूरच्या राजाविरुद्ध कुंभेरच्या लढाईत त्यांच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर अहिल्याबाईंनी माळवा ताब्यात घेतला. सासऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय आणि लष्करी रणनीतींमध्ये पारंगत झाल्या.

Ahmednagar Name Changed
Railway Accident History : ९ रेल्वे अपघात ज्यांनी संपूर्ण देशाला हादरवलं; जाणून घ्या भीषण अपघातांचा इतिहास

अहमदनगर शहराचं नाव कसं पडलं?

जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटनुसार, मध्ययुगीन काळात या प्रदेशावर राजवंश, पश्चिम चालुक्य आणि नंतर दिल्ली सल्तनत यांचे राज्य होते. पूर्वी ते निजामशाही म्हणून ओळखले जात असे. मलिक अहमद निजाम शाह याने पंधराव्या शतकाच्या सुमारास येथे एका शहराचा पाया घातला, ज्याचे नाव अहमदनगर होते.

Ahmednagar Name Changed
Express Railway : दर मंगळवारी धावणार पुणे-मिरज-पुणे एक्स्प्रेस; गाडीला असणार पाच थांबे

जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या A Discovery of India या पुस्तकात त्यांच्याबद्दल लिहिले आहे - मलिक नाईब निजाम-उल मुल्क भैरी हा मूळचा विजयनगरचा ब्राह्मण. पुढे त्याने इस्लाम स्वीकारला. त्याचा मुलगा 'अहमद' याने 1490 मध्ये बहामनी साम्राज्यातून फुटून अहमदनगर येथे निजामशाही स्थापन केली. दौलताबाद ते जुन्नर या मार्गावर ‘बिंकर’ हे एक खेडे होते. त्याच्या मध्यवर्ती ठिकाणास ‘अहमदनगर’ हे नाव देऊन माळीवाडा, मोरचूदनगर, नालेगाव, सर्जेपुरा, चाहुराणा इ. खेडय़ांना सांधून अहमदशाहने हे शहर वसविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.