AI Baby : आधी एआयचं चॅटबॉट आलं त्याने मार्केट गाजवलं, आता एआय बाळं देखील जन्माला येणार

कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली मुले म्हणजेच एआय बेबीज जन्माला येणार
AI Baby
AI Babyesakal
Updated on

AI Baby : एआय.. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. या एआयला दोन बाजू आहेत. काही शास्त्रज्ञ म्हणतात की, एआयमुळे मानवावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. याचे पडसाद खूप वाईट असतील, थोडक्यात एआय मानव जातीसाठी शाप ठरेल. तर अर्धेजण म्हणतात एआयमुळे मानवी जीवन सुखकर होणार आहे.

आता एआयचं चॅटबॉट आलेत, त्यांनी अख्खं मार्केट हलवून टाकलं होतं. पण आता कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली मुले म्हणजेच एआय बेबीज जन्माला येणार आहेत. या तंत्राच्या मदतीने गर्भाच्या विकासादरम्यान अनेक गोष्टींचा अंदाज लावता येणार असल्याचं म्हटलं जातंय.

AI Baby
Monsoon Travel Tips: पावसाळ्यात फिरायला जाताना या गोष्टी पहिल्या पॅक करा! ट्रिपचा आनंद होईल दुप्पट

जसं की- हा गर्भ किती यशस्वी होईल की नाही, यामध्ये अनुवांशिक रोगांचे हस्तांतरण होईल की नाही. थोडक्यात अशा गोष्टी ज्या मानवी डोळ्यांना दिसत नाहीत. अमेरिकेत या तंत्राचा वापर करून अशा बाळांचा जन्म होऊ शकतो. त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

AI Baby
Car Maintenance Tips : पावसाचं पाणी कारमध्ये शिरलंय? मनस्ताप टाळायचा असेल तर फॉलो करा या टिप्स

एआय बेबी म्हणजे काय?

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, हे तंत्र आयव्हीएफ प्रक्रियेत वापरले जाईल. ज्यांना मुले होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ही प्रक्रिया वापरली जाते. या प्रक्रियेद्वारे वंध्यत्वावर उपचार केले जातात. आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान, गर्भ विकसित केला जातो आणि स्त्रीच्या गर्भाशयात त्याचे प्रत्यारोपण केले जाते. आता या गर्भाची तपासणी अशा कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज सॉफ्टवेअरद्वारे केली जाणार आहे, ज्यामुळे याविषयी खूप माहिती मिळेल. या भ्रूणातून जन्मलेल्या मुलांनाच एआय बेबी म्हटले जात आहे.

AI Baby
Best Time for Yoga : ‘या’ वेळी Yoga करणं ठरतं अधिक फायदेशीर? जाणून घ्या योगासाठी Best time कोणता?

कृत्रिम बुद्धिमत्ता किती प्रभावी आहे?

अहवालानुसार, IVF प्रक्रियेदरम्यान, आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे त्याच्या यशाचा दर वाढविला जात आहे. असा दावा करण्यात आला आहे की AI अल्गोरिदम वापरून, IVF च्या यशाचा दर 30% पर्यंत वाढवता येतो. गर्भधारणेच्या बाबतीत, सध्या हे तंत्र युरोप, आशिया, दक्षिण अमेरिकेत वापरले जात आहे. आता ते अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सुरू होईल.

AI Baby
Kareena's Health Tips : हेल्दी राहण्यासाठी बेबो रोज रात्री न विसरता हा पदार्थ टाकून पिते दूध

नवीन पद्धत दिलासा देणारी का ठरू शकते, ते आता समजून घेऊ.

वास्तविक, आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान गर्भाचा विकास होतो. यानंतर, भ्रूण यशस्वीरित्या विकसित झाला आहे की नाही हे तपासले जाते. त्यानंतरच भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केले जाते. तपासाची ही प्रक्रिया खूप खर्चिक आहे. जगातील अनेक देशांमध्ये एका सत्रासाठी सुमारे 10 लाख रुपये घेतले जातात. यानंतरही नवीन भ्रूण यशस्वी होईलच याची शाश्वती नाही. अहवालानुसार, जगभरातील आयव्हीएफ प्रकरणांमध्ये यशाचे प्रमाण केवळ 24 टक्के आहे.

AI Baby
Kareena's Health Tips : हेल्दी राहण्यासाठी बेबो रोज रात्री न विसरता हा पदार्थ टाकून पिते दूध

AI च्या माध्यमातून भ्रूणांचे परीक्षण करणार्‍या AIVF या कंपनीच्या सीईओ भ्रूणशास्त्रज्ञ डॉ. डॅनिएला गिलबोआ म्हणतात, भ्रूण निवड ही आयव्हीएफ प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आतापर्यंत मानवी डॉक्टर हे काम करत होते, पण आता त्याची गुणवत्ता एआयच्या माध्यमातून तपासली जाऊ शकते.

AI Baby
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने AI ट्रेंड केला फॉलो!

सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास, सर्व भ्रूण दिसायला सारखे दिसतात, अशा परिस्थितीत कोणता भ्रूण चांगला सिद्ध होईल हे ठरवणे कठीण होते. अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञांना मदत करेल. चाचणीदरम्यान हा तपास करण्यात आला, त्यात यश आले आहे.

AI Baby
AI मध्ये नशीब आजमावायचे आहे ? त्यासाठी काय करावं लागेल

इतर मुलांच्या तुलनेत यातून जन्म झालेल्या मुलांना जनुकीय आजारांचा धोका कमी असू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. म्हणजेच जन्मजात किंवा भविष्यात असाध्य रोग होण्याचा धोका कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.