नवी दिल्ली : भारतातील शिक्षण क्षेत्रात एक क्रांतीकारक पाऊल टाकण्यात आलं आहे. त्याची सुरुवात केरळमधील एका शाळेतून झाली आहे. या शाळेनं AI तंत्रज्ञानावर काम करणारी शिक्षिका नियुक्त केली आहे. या शिक्षिकेचं नाव आयरिस असं असून मेकरलॅब्ज एज्युटेक कंपनीच्या सहकार्यानं विकसित केलं आहे. आयरिस केरळमधील आणि संपूर्ण देशातील पहिलंच ह्युमनाईज्ड रोबोट आहे. (AI teacher came to teach in school special initiative of school in Kerala)
केटीसीटी उच्च माध्यमिक शाळेनं हे संशोधन केलं आहे. कडुवाईल थंगल चॅरिटेबल ट्रस्टनं यासाठी प्रयत्न केले. आयरिस अटल टिकरिंग लॅब (एटीएल) प्रोजेक्टचा भाग आहे. २०२१ मध्ये नीती आयोगानं याची घोषणा केली होती. शाळांमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटिजला प्रोत्साहन देण्यासाठी हे डिझाईन करण्यात आलं होतं. (Marathi Tajya Batmya)
केरळच्या 'या' शाळेत देशातील पहिली AI शिक्षिका शिकवणार
मेकरलॅब्ज कंपनीद्वारे इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओत या बहुभाषिक AI शिक्षिकेच्या क्षमता तपासल्या जाऊ शकतात. आयरिस विविध विषयांवरील अवघड प्रश्नांची उत्तर देऊ शकते. तसेच पर्सनल व्हॉईस असिस्टंट देखील देऊ शकते. (Latest Marathi News)
तसेच इंटरअॅक्टिवली शिक्षणाचा अनुभव सुविधाजनक करु शकते. भारत सरकारचा प्रोजेक्ट एटीएलचा हा एक भाग आहे. ज्याचा उद्देश शाळांमध्ये मुलांचा अॅक्टिव्हिटिजमध्ये सहभाग वाढावा हा आह. आयरिस तीन भाषेत बोलू शकते तसेच अवघड प्रश्नांची उत्तरंही देऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.