भाजपला झटका! दक्षिणेकडच्या सत्तेचं स्वप्न भंगणार; आणखी एका मित्रपक्षानं सोडली साथ

PM Narendra Modi
PM Narendra Modifile photo
Updated on

चेन्नई- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर एआयएडीएमके पक्षाने भाजपसोबत सर्व प्रकारचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. एआयएडीएमके पक्षाने भाजप आणि एनडीएसोबतचे कोणत्याही प्रकारचे संबंध न ठेवण्याबाबत पक्षाच्या बैठकीत ठराव मंजूर केला आहे. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

AIADMK समन्वयक के पी मुनुसामी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पक्षाने हा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. पक्ष कार्यालयाबाहेर फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. AIADMK च्या निर्णयामुळे तमिळनाडूमध्ये भाजपला हातपाय पसरणे अवघड जाणार आहे.

PM Narendra Modi
Kaveri River : तमिळनाडू-कर्नाटक कावेरी पाणी वाटप याचिकेवरील सुनावणी २१ पर्यंत पुढे ढकलली

एनडीएसोबत अधिकृतरीत्या एआयएडीएमकेने सर्व संबंध तोडले आहे. राज्यातील भाजप नेतृत्वाकडून वारंवार एआयएडीएमकेच्या माजी नेत्यांवर टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काही महिने शिल्लक असताना हा निर्णय आला आहे. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का असल्याचं मानलं जातंय.

PM Narendra Modi
Supreme Court : 'कावेरी'चा वाद पेटला! तमिळनाडू विरुद्ध कर्नाटक सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव; तोडगा निघणार?

तमिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी वारंवार एआयएडीएमके पक्षातील दिवंगत नेत्यांवर टीका केलीये. त्यांनी पक्षाचे मार्गदर्शक दिवंगत माजी मुख्यमंत्री सीएन अन्नादुराई आणि माजी मुख्यमंत्री जयललीता यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अन्नमलाई यांनी माफी मागावी अन्यथा भाजपने पक्ष नेतृत्व बदलावं अशी मागणी एआयएडीएमके पक्षाने केली होती. त्यानंतर अखेर संबंध तोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.