सहारनपूर जिल्हा कारागृहातील काही कैद्यांची सुटका झाली आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सहारनपूर जिल्हा कारागृहात (Saharanpur District Jail) बंदिस्त कैद्यांसाठी आरोग्य विभागानं (Department of Health) गेल्या महिन्यात तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं. मंगळवारी त्याचा अहवाल येताच, आरोग्य विभाग आणि कारागृह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या अहवालात कारागृहातील एका महिलेसह 24 कैद्यांना एचआयव्हीची (HIV) लागण झाल्याचं समोर आलंय. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तपासणी शिबिराचा अहवाल आरोग्य विभागानं शासनाकडं पाठवलाय.
कारागृहातील डॉ. प्रवीण कुमार यांनी सांगितलं की, जिल्हा कारागृहातील काही कैद्यांची सुटका झाली असून काहींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर सध्या 19 पुरुष व एक महिला कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. जिल्हा कारागृहात अनेक कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याने कारागृह प्रशासनही गोंधळात पडलंय. आता या सर्व कैद्यांवर जिल्हा आरोग्य विभागाकडून अँटी रेट्रो व्हायरल थेरपीनं उपचार सुरू करण्यात आले आहेत. सहारनपूर जिल्हा कारागृहात सध्या एकूण 2150 कैदी बंद आहेत.
या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीव मांगलिक सांगतात की, वेळोवेळी कारागृहात शिबिरे लावून कैद्यांची स्वयंसेवी संस्थेमार्फत आरोग्य तपासणी केली जाते. याच क्रमाने नुकतेच १५ ते १८ जून असे चार दिवसीय शिबिर घेऊन कैद्यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या अहवालात एकूण 24 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. सध्या सर्वांवर उपचार सुरू आहेत. 2013 मध्ये सहारनपूरच्या जिल्हा रुग्णालयात अँटी रेट्रो व्हायरल थेरपी सेंटरची (Antiretroviral Therapy Center) स्थापना करण्यात आली होती. यामध्ये सुमारे 2280 लोक एचआयव्ही नोंदणीकृत असून सुमारे 2000 लोकांवर जिल्हा रुग्णालयात असलेल्या एआरटी सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.