Aids Humen Story : ‘मला अनाथ करून देवाचे समाधान झाले नाही म्हणून त्याने HIV भेट दिला’

एड्स बाधित तरूणाच्या आयुष्याचे भयान वास्तव
Aids Humen Story : ‘मला अनाथ करून देवाचे समाधान झाले नाही म्हणून त्याने HIV भेट दिला’
Updated on

एड्स लोकांचे आरोग्यच नाही तर आयुष्यही उध्वस्त करतो. एड्सबद्दल लोकांमध्ये जागरूकता कमी आहे. त्यामूळे या रोगासंबंधी लोकांच्या मनात भिती आहे. एड्स झाल्याचा धक्का पचवणं अशक्यच असते. त्यात जर एखादा ३० वर्षाचा तरूण जो अनाथ आहे. त्याची काळजी घ्यायला कोणी नाही, अशा व्यक्तीला काय वाटत असेल याचा कधी विचार केलाय का?. जतीन नावाच्या एका तरूणाला वयाच्या ३० व्या वर्षीच एड्स झालाय. त्याला काय वाटतं आणि त्याला याबद्दल काय वाटत हे तो स्वत:च्या तोंडून सांगतोय. पाहूयात त्याची कहाणी... Aids Humen Story : human story on hiv aids patient in india

मी जतीन माझे वय ३० असून मला आई वडील नाहीत. असतील तरी ते मला आठवत नाहीत.मी जयपूरमधील अनाथाश्रमात वाढलो. त्यामूळे मला बालपण आठवलं की सगळ्यात आधी आश्रमातील बंदिस्त भिंती आठवतात. रया गेलेल्या, रंग उडालेल्या भिंती आजही अंगावर धावून आल्यासारख्या वाटतात. त्या भिंतींचे वास्तव लपवण्यासाठी काही मूले त्यावर हसणाऱ्या मुलांचे फोटो लावल्याचे मला आठवते.

नियमानूसार वयाच्या १८ व्या वर्षी आश्रमाबाहेर पडावे लागते. मी 17 वर्षांचा होताच तिथून पळून गेलो. मला अभ्यास करावासा वाटत नव्हता. आश्रमात शिवण-विणकाम, सुतारकाम यांसारखी कामे शिकवली गेली. पण मला तीही आवडली नाही. मी बाहेर पडत असताना माझ्या हातात कसलेही कौशल्य नव्हते. आणि खिशात पैसेही नव्हते. त्यावेळी पोट खिशासारखेच रिकामे होते. संध्याकाळपर्यंत भटकून एका ढाब्यावर थांबलो. भरपूर खाल्ले आणि पैशाऐवजी काम देण्याची शिफारस केली. भांडी धुण्यापासून ते भाजीपाला कापण्यापर्यंतची सर्व कामे त्यांनी मला दिली.

Aids Humen Story : ‘मला अनाथ करून देवाचे समाधान झाले नाही म्हणून त्याने HIV भेट दिला’
Measles Vaccine : गोवर लसीचा शोध कोणी लावला? जाणून घ्या

मी शारीरिकदृष्ट्या मजबूत होतो पण कामात तितकाच बेफिकीर होतो. मी भांडी धुतली तर ती तशीच खरकटी रहायची. मी भाजी अशी कापली जणू मी त्यांना मारत होतो. सर्व्ह करताना प्लेट टेबलावर अशी ठेवली की, ग्राहक घाबरले होते. ढाबावाला मला हाकलण्याआधीच मी एका ट्रक ड्रायव्हरसोबत तिथून पळून गेलो.

त्या ट्रक ड्रायव्हरसोबत मी पळून दुसऱ्या राज्यात गेलो. ट्रकचा प्रवास मला अधिक उत्साही वाटत होता. कारण, आश्रमाच्या जीव गेलेल्या बंदिस्त भिंती सोडून मी काहीच पाहिले नव्हते. पण, आता ट्रकच्या बाजूच्या सीटवर बसून धबधबे, नद्या, पर्वत, वाळू सर्व काही पाहिले. त्या ट्रक ड्रायव्हरला मी भाऊ म्हणू लागलो. त्याच्या संगतीने मी दारू पिऊ लागलो. माझ्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने मला काही जागाही सुचवल्या.

Aids Humen Story : ‘मला अनाथ करून देवाचे समाधान झाले नाही म्हणून त्याने HIV भेट दिला’
Post Pregnancy : बाळंतपणानंतर वाढलेले पोट कसे कमी कराल ?

एकदा त्याच्यासोबत प्रवासात महामार्गालगतच्या झाडांवर अनेक रंगांचे झेंडे लटकले होते. या रंगीबेरंगी ध्वजांचे अनेक अर्थ आहेत. एक अर्थ असा की या परिसरात तूमची शारीरीक गरज भागवण्यासाठी तरूणी भेटू शकतात. मी पहिल्यांदा त्या भाऊसोबत गेलो होतो तेव्हा माझे पाय थरथरत होते. जणू हृदय बंद पडेल की काय असे ते धडधडत होते. घामाने डबडबलेल्या हातांनी मी ड्रायव्हरला थांबवले आणि तिथे जाण्यास नकार दिला. त्याने मला ओढतच तिथे नेले. तो मला म्हणाला की, एकदा तू तिथे चल मग सगळी भिती दूर होईल. त्यानंतर गरज भासली की मी स्वत:हाच अशा जागा शोधू लागलो. अनेक वर्षे माझी अशा रस्त्यावर भटकण्यात गेली. या दरम्यान मी ट्रक चालवायलाही शिकलो. कधीकाधी नवे वाटणारे रस्ते, धबधबे यांचे कुतूहल वाटणे बंद झाले होते.  

या जीवन प्रवासात माझे वयही वाढत होते आणि मी अनाथ आहे हे विसरून गेलो होतो. रोज ढाब्यावर जात असल्याने तिथे भेटलेल्या काही लोकांशी घट्ट मैत्री झाली. मित्र रोज भेटायचे आमची मैफील रंगायची. देवाला माझ्या आयुष्यात आलेले हे मित्रही बघवले नाहीत. एके दिवशी जाग आली आणि मला हलकीशी थंडी वाजत होती. एका ट्रक ड्रायव्हरसाठी हे काही नवे नाही. त्यामूळे मी दुर्लक्ष केले.

सतत ताप येत होता त्यामूळे वैतागून मी डॉक्टरकडे पोहोचलो. माझ्या सतत येणाऱ्या तापाची लक्षणे पाहता त्यांनी माझ्या काही टेस्ट केल्या. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीने मी हादरून गेलो. मला एड्स झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावर नक्की काय प्रतिक्रीया द्यावी हे समजत नव्हते. त्याच विचारात मी घरी कधी पोहोचलो हे मलाही समजले नाही. हो मी ही स्वत:ची एक खोली घेतली होती. त्या खोलीला मी घर म्हणत असे. म्हणायलाच केवळ घर होते. तिथे ना कुटुंब होते ना काळजी करणारे कोणी.

Aids Humen Story : ‘मला अनाथ करून देवाचे समाधान झाले नाही म्हणून त्याने HIV भेट दिला’
Men Health Tips: पुरुषांनी बडीशेप का खावी? खाण्याचे फायदे वाचाल तर अवाक व्हाल

घरात अल्यावर मी खाटेवर पसरलो आणि त्याच जीर्ण झालेल्या भिंतीवरील पोस्टर पाहू लागलो. ट्रक चालवणं, मित्रांना भेटणं, ठिकठिकाणी जाणं यात मी गुंग झालो होतो की, माझ्या घरातील भिंतीवर असलेले पोस्टरची कधी स्वच्छताही मी केली नव्हती. पण, त्या दिवशी मला ती करावीशी वाटली. कारण ते देवाचे पोस्टर होते. देवाच्या या पोस्टरसमोर हात जोडून नमस्कार करावा की दुवा मागावी हेही मला ठाऊक नव्हते. कारण, मी जन्माला आलो आणि मला आश्रमात आणून सोडण्यात आले. त्यामूळे माझा धर्म कोणता हेही मला माहिती नव्हते.

मी आता ट्रक चालवणे बंद केले आहे. ज्या मित्रांना मी स्वतःचे हक्काचे समजायला सुरुवात केली होती. ते एड्सबद्दल ऐकून अस्वस्थ झाले. त्यांनी मला भेटणे बंद केले. मी ढाब्यावर जाणेही बंद केले. खोली बदलली आणि एका नव्या शहरात रिक्षा चालवण्याची नोकरी पत्करली. व्यायाम करत नाही त्यामूळे वजन वाढले आहे. बरेचदा खूप बोलके भाडेकरू भेटतात. त्यांच्या गोष्टी ऐकल्यावर मलाही माझी व्यथा सांगावीशी वाटते. पण, मी आता शहर सोडायला घाबरतो. त्यामूळे मी एकटाच माझ्या घरातील जीर्ण भिंती पाहत जगतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.