कोविड-19 चा मुलांवर होणारा परिणाम प्रौढांच्या तुलनेत नगण्य - AIIMS

children
childrenesakal
Updated on

कोविड-19 संसर्गाचा (covid19) परिणाम मुलांपेक्षा (children) प्रौढांवर जास्त होतो. मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त नाही किंवा त्यांच्यात गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेसच्या (AIIMS) डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासात हे तथ्य समोर आले आहे 12 ते 18 वर्षे वयोगटातील 197 रुग्णांवर एक अभ्यास (study) करण्यात आला. ज्यांना कोविड-19 च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

197 रुग्णांवर अभ्यास

या अभ्यासात असे आढळून आले की, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 84.6% किशोरवयीन मुलांनी अतिशय सौम्य लक्षणे अनुभवली. तर 9.1% मध्ये मध्यम आणि 6.3% मध्ये गंभीर लक्षणे दिसली. ताप आणि खोकला ही सर्वात सामान्य लक्षणे होती, त्यापैकी १४.९% लोकांना ती जाणवली. 11.5% मुलांना शरीर दुखत होते, तर 10.4% मुलांना अशक्तपणा जाणवला होता. केवळ 6.2% मुले ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत होता त्यांच्या संपर्कात होते. तर, त्याच हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या वेव्ह दरम्यान 50.7 टक्के प्रौढांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवला.

children
पंतप्रधान मोदी आज देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

केवळ 7.3 टक्के मुलांना ऑक्सिजनची गरज होती

अभ्यासानुसार, कोरोनाची लागण झालेल्या केवळ 7.3% मुलांना ऑक्सिजनची गरज भासली, तर 2.8% मुलांना ऑक्सिजनचा उच्च प्रवाह आवश्यक आहे. 24.1% मुलांना स्टिरॉइड्स आणि 16.9% मुलांना अँटीव्हायरल औषध रेमडीसिव्हिर देण्यात आले.

children
प्रचारासाठी उत्तर प्रदेशात भाजपची मोठी फौज, IT सेलही सज्ज

मृत्यू दर सहा पट कमी ज्या रुग्णालयात हा अभ्यास करण्यात आला, तेथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान किशोरवयीन मुलांचा मृत्यूदर ३.१ टक्के होता. तर, प्रौढांसाठी मृत्यू दर 19.1% आहे, जो लहान मुलांच्या तुलनेत सहापट जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.