ब्लॅक फंगस कसा ओळखाल? उपचार काय? AIIMSची नवी नियमावली

ब्लॅक फंगसचे रुग्ण उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये आढळून आले आहेत. दिल्लीतील मॅक्स, एम्स, सर गंगाराम आणि मूलचंद हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक रुग्ण दाखल आहेत.
Black fungus
Black fungusGoogle file photo
Updated on
Summary

ब्लॅक फंगसचे रुग्ण उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये आढळून आले आहेत. दिल्लीतील मॅक्स, एम्स, सर गंगाराम आणि मूलचंद हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक रुग्ण दाखल आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona 2nd wave) थैमान घातले असताना ब्लॅक फंगस (Mucormycosis) या आजाराने आणखी डोकेदुखी वाढवली आहे. देशाच्या विविध भागातून रुग्णांची संख्या पुढे येत आहे. काही ठिकाणी ब्लॅक फंगसमुळे (Black fungus) रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एकट्या महाराष्ट्रात ब्लॅक फंगसमुळे आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, राजस्थानसहित अन्य राज्यांत रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. (AIIMS issued new guidelines to detect black fungus)

या पार्श्वभूमीवर एम्स (AIIMS)कडून नवी नियमावली प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे ब्लॅक फंगसची लागण झाल्याचे आणि त्याला रोखण्यासाठी वेळीच उपाय करण्यासाठी मदत होईल. तसेच ब्लॅक फंगसची शिकार होईल, असे जे रुग्ण असतील, त्यांची वारंवार तपासणी करा, अशा सूचना एम्सने डॉक्टरांना दिल्या आहेत.

Black fungus
राजधानीत पाणीच पाणी; पावसाने मोडला ४५ वर्षांचा रेकॉर्ड

यांना सर्वात जास्त धोका

- ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, आणि जे स्टेरॉइड किंवा टोसिलिजुमैब इंजेक्शनचा वापर करत आहेत, त्यांना ब्लॅक फंगसचा सर्वात जास्त धोका आहे.

- तसेच ज्या व्यक्ती कर्करोग (Cancer) वरील उपचार घेत आहेत, किंवा खूप दिवसांपासून एखाद्या आजाराने ग्रासलेले आहेत, त्यांनाही धोका आहे.

- कोरोनामुळे जे रुग्ण ऑक्सिजन मास्क किंवा व्हेंटिलेटरवर आहेत, अशा रुग्णांनाही ब्लॅक फंगसची लागण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ब्लॅक फंगस कसा ओळखाल?

कोरोना रुग्णांची देखभाल करणारे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना ब्लॅक फंगसची लक्षणे ओळखणे सोपे आहे.

- नाकातून रक्त येणं, डोक्यात घाण जमा होणे

- नाक बंद होणे, डोके आणि डोळे दुखणे, डोळ्यांभोवती सूज येणे, अस्पष्ट दिसणे, डोळे लाल होणे, पापण्यांची उघडझाप करण्यात अडचण येणे

- चेहरा सुन्न पडणे, खाज सुटणे

- तोंड उघडण्यात तसेच अन्न चावण्यात अडचणी निर्माण होणे

- दात पडणे, तोंडात सूज येणे

वरील पैकी कोणती लक्षणे दिसत आहेत का, हे दररोज पडताळून पाहा.

Black fungus
WHO नंतर ICMRनं सांगितलं दुसऱ्या लाटेचं कारण

ब्लॅक फंगस झाल्यानंतर काय करायचं?

एखाद्या व्यक्तीला ब्लॅक फंगसची लागण झाली किंवा लक्षणे दिसू लागली की काय करावे, याबाबत एम्सने माहिती दिली आहे.

- कोणत्याही डॉक्टरशी संपर्क साधा. डोळ्यांचे तज्ज्ञ किंवा डोळे, त्वचा आणि संबंधित आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरकडे जा.

- दररोज उपचारांचे अनुसरण करा. जर आपल्याला मधुमेह असेल, तर रक्तातील साखरेचे परीक्षण करा.

- इतर कोणताही आजार असेल, तर नियमित औषधे घ्या आणि परीक्षण करा.

- स्टेरॉइड किंवा इतर कोणतेही औषध घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करा.

- डॉक्टरांनी सांगितल्यानंतर एमआरआय आणि सीटी स्कॅन करा. नाक-डोळ्यांची तपासणी देखील आवश्यक आहे.

दरम्यान, ब्लॅक फंगसचे रुग्ण उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये आढळून आले आहेत. दिल्लीतील मॅक्स, एम्स, सर गंगाराम आणि मूलचंद हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक रुग्ण दाखल आहेत. मूलचंद हॉस्पिटलमधील एका रुग्णाचा बुधवारी (ता.१९) मृत्यू झाला होता. तसेच राजस्थान सरकारने ब्लॅक फंगसला कोरोनाप्रमाणे महामारी म्हणून घोषित केले आहे.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.