कोरोनाच्या दोन लाटा परतवून लावल्यानंतर आता देशभरात तिसऱ्या लाटेची (covid-third-wave) चर्चा सुरु झाली आहे. या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुले व तरुणांना बसणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या लाटेचा लहान मुलांना नेमका किती आणि कशा पद्धतीने फटका बसेल यावर सध्या अभ्यास केला जात आहे. त्यातच संशोधक आणि विशेषज्ञ दररोज वेगवेगळे दावे करत आहेत. याच दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि AIIMS चं एक नवीन सर्व्हेक्षण समोर आलं आहे. त्यानुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांमध्ये कमी असण्याची शक्यता आहे. (aiims-study-covid-third-wave-seropositivity-children-antibodies)
लहान मुलांमध्ये सार्स कोवि-२ सीरो पॉझिटिव्हिटीचा (Sero-positivity) दर वयस्क व्यक्तींच्या तुलनेत जास्त आहे. म्हणूनच, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना हा विषाणू त्रासदायक ठरण्याचा धोकाही कमी असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या देशात याविषयी अभ्यास सुरु असून अंतिम टप्प्यात हा महत्त्वाचा दावा करण्यात आला आहे.
सीरो पॉझिटिव्हिटी (Sero-positivity) हा रक्तातील एक प्रकारचा अँटीबॉडीचा प्रकार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिसऱ्या लाटेचा मुलांना व तरुणांना अधिक धोका असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या रिपोर्टमुळे पुन्हा नव्या चर्चेचा उधाण आलं आहे.
हा रिपोर्ट १५ मार्च ते १५ जून या कालावधीत तयार करण्यात आला असून या रिपोर्टसाठी ४ हजार ५०९ जणांनी सहभाग नोंदवला होता, त्यापैकी ७०० जण हे १८ वर्षांखालील वयोगटातील होते आणि ३ हजार ८०९ हे १८ वर्षे पूर्ण झालेले होते. सहभागी झालेल्या व्यक्ती दिल्ली (शहरी भाग), दिल्ली (ग्रामीण, दिल्ली-एनसीआरमधील फरीदाबाद जिल्ह्यातील गावे), भुवनेश्वर, गोरखपूर, अगरताळा या पाच राज्यातील होत्या. तयार करण्यात आलेला रिपोर्ट बहुकेंद्रित, लोकसंख्या, वयोगट यांच्यावर आधारित होता. विशेष म्हणजे ५ राज्यातील १० हजार प्रस्तावित लोकसंख्येच्या आधारावर तो करण्यात आला आहे.
१८ वर्षांखाली मुलांमध्ये ५५.७ सीरो पॉझिटिव्हिटी (Sero-positivity) आहे. तर, १८ पेक्षा जास्त वयोगटातील मुलांमध्ये याचं प्रमाण ६३.५ टक्के आहे. त्यामुळे वयस्क व्यक्ती व लहान मुले यांच्यातील सीरो पॉझिटिव्हिटी (Sero-positivity) ची संख्या तुलनेने फारशी वेगळी नाही.
दरम्यान, दिल्ली शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील मुलांमध्ये सीरो पॉझिटिव्हिटीचं (Sero-positivity) प्रमाण कमी आढळून आलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.