मुसलमान सर्वात जास्त कंडोम वापरतात, लोकसंख्या कुठं वाढतेय? ओवैसींचा भागवतांना थेट सवाल

लोकसंख्येबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची गरज आहे : मोहन भागवत
Mohan Bhagwat Asaduddin Owaisi
Mohan Bhagwat Asaduddin Owaisiesakal
Updated on
Summary

लोकसंख्येबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची गरज आहे : मोहन भागवत

Asaduddin Owaisi News : लोकसंख्या नियंत्रणावर (Population Control) आजकाल बरीच चर्चा होताना दिसत आहे. अलीकडंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनीही लोकसंख्येच्या असंतुलनाबाबत चिंता व्यक्त केली होती. सर्वांना सारखंच लागू असणारं लोकसंख्या धोरण असावं, अशी मागणी त्यांनी केलीय.

आता मोहन भागवत यांना AIMIM खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुस्लिम लोक (Muslim Community) कंडोमचा (Condoms) सर्वाधिक वापर करतात, त्यांची लोकसंख्या वाढत नसल्याचं ओवैसींनी म्हटलंय. ओवैसी म्हणाले, 'मुस्लिमांची लोकसंख्या वाढण्याऐवजी कमी होत आहे. मात्र, मोहन भागवत यावर बोलणार नाहीत.'

Mohan Bhagwat Asaduddin Owaisi
Shiv Sena : शिवसेना संकटात असताना प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, आम्ही युतीसाठी..

ओवैसींनी आकडेवारीचा हवाला देत सांगितलं की, मुस्लिमांचा एकूण प्रजनन दर (TFR) कमी होत आहे. ते (मोहन भागवत) म्हणतात लोकसंख्या नियंत्रित केली पाहिजे. पण मी म्हणतो की, मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नाहीये. लोकसंख्या वाढत आहे या भयंकर तणावाखाली तुम्ही लोक पडू नका. लोकसंख्या कमी होत असून दोन मुलांमधील फरक, ज्याला अंतर म्हणतात, तो मुस्लिमांमध्ये देखील सर्वात मोठा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Mohan Bhagwat Asaduddin Owaisi
Karnataka : SC/ST आरक्षणाबाबत भाजप सरकारचा मोठा निर्णय; 50 टक्के कोटा मर्यादा रद्द करण्याची शक्यता!

'मुस्लिमांचा टीएफआर घसरत आहे'

ओवैसी पुढं म्हणाले, 'एकदा एका टीव्ही चॅनलवर मला बोलावलं होतं. मी सांगितलं की, मी जर उघडपणे बोललो तर मला बोलू द्या. भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या बापानं किती मुलं घडवली ते मी सांगेन. यावर टीव्ही चॅनलच्या व्यक्तीनं तुमचं म्हणणं बरोबर आहे; पण असं करू नका असं सांगितलं. मुस्लिमांचा टीएफआर कमी होत आहे, काळजी करू नका. आपण सर्वात जास्त कंडोमचा वापर करतो. मात्र, मोहन भागवत यावर बोलणार नाहीत. तुम्ही डेटा समोर ठेवा आणि बोला, लोकसंख्या कुठे वाढतेय?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Mohan Bhagwat Asaduddin Owaisi
Amit Shah : ..त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यानं मला भररस्त्यात बेदम मारलं होतं; अमित शहांनी सांगितला 'किस्सा'

काय म्हणाले होते मोहन भागवत?

'धर्मावर आधारित लोकसंख्येच्या असमतोलाच्या मुद्द्यांकडं दुर्लक्ष करता येणार नाही. लोकसंख्येच्या असंतुलनात भौगोलिक सीमा बदलतात आणि अनेक समस्या निर्माण होतात. लोकसंख्येबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची गरज आहे. कोणालाही कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही, असं हे धोरण असावं. हा कायदा सर्वांना सारखाच लागू झाला पाहिजे, असं भागवत म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()