Women Reservation:सध्या संसदेचं विशेष सत्र सुरु आहे. महिला आरक्षण विधेयक सरकारकडून सादर करण्यात आलंय. महिला आरक्षणाच्या विधेयकाला AIMIM पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन औवेसी यांनी विरोध दर्शवला आहे. या विधेयकावर चर्चा सुरु असताना गोंधळ झाला, यावेळी औवेसींनी या विधेयकाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी या विधेयकाला असमर्थन दर्शवले आहे. यामागील कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की या विधेयकात इतर मागास वर्गातील आणि मुस्लिम महिलांविषयी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.
ते म्हणाले की, मुस्लिम महिलांची लोकसंख्या ७ टक्के आहे, पण या लोकसभेत त्यांचे प्रतिनिधित्व केवळ ०.७ टक्के आहे. ते म्हणाले की, या मोदी सरकारला केवळ उच्चवर्णीय महिलांनाच पुढे करायचे आहे. मुस्लिम महिला शिक्षणातही मागे आहेत, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळायला हवा, असे ओवेसी म्हणाले.
हैदराबादच्या खासदाराने सांगितले की, शाळा सोडणाऱ्या मुस्लिम महिलांची टक्केवारी १९ टक्के आहे, तर इतरांची केवळ १२ टक्के आहे. ओवेसी म्हणाले की, या मोदी सरकारला सवर्ण महिलांचे प्रतिनिधित्व वाढवायचे आहे. ते म्हणाले की, निवडणुकीच्या इतिहासात आतापर्यंत 690 महिला संसदेत निवडून आल्या आहेत आणि त्यापैकी केवळ 25 मुस्लिम आहेत. मुस्लिम महिलांशी हा दुहेरी भेदभाव असल्याचं ओवेसी म्हणाले. पहिलं, मुस्लिम म्हणून आणि दुसरं स्त्री म्हणून तिच्याशी भेदभाव केला गेला.
हे विधेयक मुस्लिमविरोधी-
असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, हे विधेयक फक्त बड्या लोकांना एंट्री देण्याची तयारी आहे. तुम्हाला नको आहे की लहान लोकांना म्हणजे दुर्बल घटकातील लोकांनाही संसद आणि विधानसभेत यावे. मुस्लिमांना राजकीयदृष्ट्या उपेक्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. ही देशाच्या लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही. पीएम मोदी म्हणतात की मी ओबीसी समाजाचा आहे, पण त्यांनी त्यांच्यासाठी काय केले? हे त्यांचे ओबीसी वर्गावरील प्रेम आहे. (Latest Marathi News)
AIMIM नेते म्हणाले की, हे मुस्लिमविरोधी विधेयक आहे. हे ओबीसी वर्गाच्या विरोधात आहे आणि केवळ उच्चवर्णीय महिलांना प्रोत्साहन देणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की असदुद्दीन ओवेसी हे आतापर्यंतचे पहिले नेते आहेत ज्यांनी या विधेयकाला आपला विरोध जाहीर केला आहे. त्यांच्या आधी, सपा, काँग्रेस, बीआरएस, द्रमुकसह अनेक पक्षांनी विधेयकात ओबीसी महिलांना आरक्षण देण्याबाबत बोलले, पण विधेयकाला पाठिंबा जाहीरही केला. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.