Air Force : हवाई मार्गाने साहित्य देताना दुर्घटना

पाच जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले
Air Force
Air Force esakal
Updated on

गाझा : इस्राईलने लादलेल्या प्रतिबंधांमुळे गाझा पट्टीत मदत पोहोचवणे कसे घातक आहे, हे शुक्रवारी (ता.८) घडलेल्या एका दुर्घटनेतून समजते. उत्तर पॅलेस्टिनी भागात विमानातून मदत पुरवीत असताना पॅराशूट वेळेत उघडले नाही. यामुळे मदतीची खोकी जमिनीवरील नागरिकांच्या अंगावर पडली. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत.

Air Force
Kitchen Tips : ही ट्रिक वापराल तर पाच तासात लागेल दही, फक्त या चूका करू नका

उत्तर गाझामधील अल शाती या निर्वासित छावणीजवळ ही घटना घडली. मदतीच्या प्रतीक्षेत अनेक पॅलेस्टिनी नागरिक तेथे उभे होते. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या मोहंमद अल घौल यांनी म्हणाले, की पॅराशूटमधून पिठाच्या पिशव्या मिळतील, या अपेक्षेने मी आणि माझा भाऊ पॅराशूटच्या मागे पळत होतो. पण अचानक पॅराशूट उघडले नाही.. रॉकेटप्रमाणे ते खाली येत एका घराच्या छतावर कोसळले. यामुळे छतावर राहणाऱ्यांवर खोकी आदळली. यात पाच जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. या दुर्घटनेत पाच जण ठार झाल्याची कबुली गाझामधील सरकारी प्रसारमाध्यमाने दिली आहे.

Air Force
Kitchen Tips : किचनमधील या वस्तू कधीच फेकून देऊ नका, कारण...

इस्राईल आणि हमास युद्ध सुरू झाल्यापासून गाझापट्टीत नागरिकांवर भीषण परिस्थिती ओढविली आहे. उत्तर गाझात मदत पोहोचविण्यासाठी अमेरिका आणि जॉर्डनसह काही देश विमानातून मदत खाली सोडत आहेत. ‘‘काल मदतीच्यावेळी झालेल्या दुर्घटनेशी जॉर्डनचा काहीही संबंध नाही. काही तांत्रिक बिघाडामुळे काल पॅराशूट उघडू शकले नाही आणि मदतीची खोकी जमिनीवर इतस्ततः पडली. मात्र हा दोष जॉर्डनच्या विमानात झाला नव्हता,’’ असे या देशाच्या संरक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

विमानातून मदत पुरविणे चुकीचे

विमानातून मदत पुरविण्याची कल्पना अत्यंत चुकीची असल्याचा दावा गाझा सरकारच्या प्रसारमाध्यमांनी केला आहे. मानवी हेतूने मदत करण्याऐवजी आकर्षक प्रचारासाठीच याचा वापर होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.