नवी दिल्ली : आज ८ ऑक्टोबर म्हणजेच भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन आहे. 89 वर्षांपूर्वी 1932 साली आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती. मागील नऊ दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रगती करत मोठी मजल मारली आहे. आजच्या 89 व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सदिच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटरवर ट्विट करत म्हटलंय की, हवाई योद्ध्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना भारतीय हवाई दल वर्धापनदिनाच्या सदिच्छा. भारतीय हवाई दल म्हणजे धैर्य, परिश्रम आणि अचूकता होय. त्यांनी आव्हानांच्या काळात मानवतावादी भावनेतून देशाचे रक्षण करण्यासाठी स्वतःला वाहून दिलं आहे.
भारतीय हवाई दलाच्या 89 व्या वर्धापनदिनानिमित्त दलाच्या कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना खूप साऱ्या सदिच्छा. आपल्या हवाई सैनिकांचा अभिमान वाटतो की त्यांनी विविध आव्हानांच्या वेळी चपळता आणि लवचिकतेने प्रतिसाद दिला आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.
हवाई दल दिनानिमित्त हवाई योद्धे, माजी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा. या राष्ट्राला भारतीय हवाई दलाचा अभिमान आहे. ज्यांनी शांतता आणि युद्धाच्या वेळी आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध केली आहे. मला खात्री आहे की भारतीय वायुसेना उत्कृष्टतेचे आदरणीय मानदंड कायम ठेवेल, असं भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलंय.
हवाई दलाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी
भारतीय हवाई दलाचे ध्येयवाक्य ‘नभ:स्पृशं दीप्तम्।‘ हे आहे.
'वैभवाने आकाशाला स्पर्श करा' असा या वाक्याचा अर्थ होतो.
भारताचे माजी राष्ट्रपती राधाकृष्णन् यांनी हवाई दलाचे ध्येयवाक्य म्हणून हे वाक्य सुचवलं होते.
सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते.
12 मार्च 1945 रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअरफोर्स असे झाले.
1950 साली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या नावातील रॉयल हा शब्द वगळण्यात आला.
भारतीय हवाई दल हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे.
केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे भारतापेक्षा अधिक मोठे हवाई दल आहे.
1933 पासून आत्तापर्यंत भारतीय हवाई दलाच्या ध्वजावरील आणि विमानांवर छापण्यात येणाऱ्या हवाई दलाचे बोधचिन्ह चार वेळा बदलण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.