Helicopter Crash: आणखी एक हेलिकॉप्टर दुर्घटना; सेनेचं हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात कोसळलं

Bihar News: घटनेनंतर SDRFची एक टीम आणि स्थानिक गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले. हेलिकॉप्टरमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढलं. काही लोकांनी बोटीद्वारे बचावकार्य सुरु केलं. तर काही महाभाग हेलिकॉप्टरमधून आणलेलं सामान लुटण्यात व्यस्त होते.
Helicopter Crash: आणखी एक हेलिकॉप्टर दुर्घटना; सेनेचं हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात कोसळलं
Updated on

Helicopter Accident: पुण्यातल्या बावधन येथे बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर क्रॅश होऊन तिघा जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मुंबईहून घेण्यासाठी हेलिकॉप्टरने पुण्यातून उड्डाण केलं होतं. परंतु काहीच वेळात हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं.

पुण्यात ही घटना घडलेली असताना बिहारमध्ये आणखी एक हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागामध्ये पाण्या कोसळलं. ही घटना मुजफ्फरपूर येथे घडली आहे. पूरग्रस्त नागरिकांना मदत नेण्याचं काम हे हेलिकॉप्टर करत होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, सीतामढी येथून गरजेचं सामान घेऊन हवाई दलाचं हेलिकॉप्टर मुजफ्फरपूरच्या पूरग्रस्त भागामध्ये गेलं होतं. त्याचवेळी हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि ते पुराच्या पाण्यात कोसळलं.

Helicopter Crash: आणखी एक हेलिकॉप्टर दुर्घटना; सेनेचं हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात कोसळलं
Crime: बाईकवरून जाताना कट मारला, वादाला तोंड फुटले, दोघं थेट कॉलेजमध्ये घुसले, तरुण दिसला अन्... रक्तरंजित शेवटाने खळबळ

घटनेनंतर SDRFची एक टीम आणि स्थानिक गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले. हेलिकॉप्टरमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढलं. काही लोकांनी बोटीद्वारे बचावकार्य सुरु केलं. तर काही महाभाग हेलिकॉप्टरमधून आणलेलं सामान लुटण्यात व्यस्त होते.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. इंजिन फेल झाल्यानंतर पायलटने पाण्यामध्ये लँडिंग केलं. त्यामुळे एअरफोर्सचे सर्व जवान आणि स्वतः पायलट सुरक्षित राहिले.

जखमींना उपचारासाठी एसकेएमसीएचला पाठवण्यात आलं. एसडीआरएफच्या एक टीमने घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं होतं. त्यामुळे बिहार सरकारने एसडीआरफच्या टीमला पुरस्कृत करण्याची घोषणा केली आहे. घटना घडली तेव्हा काही स्थानिक लोक सेल्फी काढत व्हिडीओ बनवत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.