Plane Emergency Landing: बॉम्बने उडवण्याची धमकी अन् हवेत झेपावलेलं विमान तातडीनं खाली उतरवलं! घटनेनं तणावाची परिस्थिती

Air India Plane: एअर इंडियाच्या विमानाला गुरुवारी सकाळी बॉम्बची धमकी मिळाली. तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरले. विमान तातडीने रिकामे करण्यात आले. विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली. विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
plane
PlaneSakal
Updated on

मुंबईहून केरळला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आली. यानंतर खळबळ उडाल्याचे पहायला मिळाले. बॉम्बच्या धमकीनंतर एअर इंडियाचे विमान केरळमधील तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरवण्यात आले. फ्लाइट 657 मुंबईहून निघाली होती. यानंतर त्यात बॉम्ब असल्याचे समोर आले. मात्र, धमकीमध्ये कितपत तथ्य आहे? त्याचा तपास सुरू आहे. विमान तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरवण्यात आले आहे. तिरुवनंतपुरम विमानतळावरून सांगण्यात आले की, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. विमानाला आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.