दिल्लीहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाबाबत एक थरारक घटना घडल्याचं समोर आलं आहे. विमानानं उड्डाण केल्यानंतर ते काही वेळातच पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरलं, त्यानंतर या विमानानं तातडीनं युटर्न घेतला आणि ते पुन्हा दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झालं. यावेळी विमानातील प्रवाशांना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात आल्यानं खळबळ उडाली होती. (Air India aircraft entered Pakistan airspace shocking incident happened in Air)
एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान बोईंग 787-8 ड्रीमलाइनर फ्लाइट क्रमांक AI0111 नं गुरुवारी सकाळी 7.15 वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. उड्डानानंतर काही वेळातच पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर काही मिनिटांतच अचानक नवी दिल्लीला परतलं. (Latest Marathi News)
या विमानानं 36 हजार फूट उंचीवरून यूटर्न घेतला आणि त्यानंतर विमान सकाळी साडेनऊ वाजता नवी दिल्ली विमानतळावर यशस्वीरित्या उतरलं. (Marathi Tajya Batmya)
या विमानातून प्रवास करणारा प्रवासी यशवर्धन त्रिखा यानं ट्विट केलं की, एअर इंडियाच्या खराब सेवेमुळं सर्व प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. (AI0111) फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्या कारणानं AC काम करत नव्हता आणि इतर समस्या देखील होत्या. वैमानिक हवेत प्रयोग करत होता, असा आरोपही त्यानं यावेळी केला.
प्रवाशांच्या तक्रारीला उत्तर देताना एअर इंडियानं म्हटलं की, "ऑपरेशनल कारणांमुळं विमानाला उशीर झाला. आम्हाला याची खंत आहे की उशीर होणं हे नक्कीच अस्वस्थ करणारं आहे. ऑपरेशनल कारणांमुळं फ्लाइटला उशीर झाला आहे आणि त्यामुळं होणारी गैरसोय कमी करण्यासाठी आमची टीम तत्परतेनं काम करत आहे. तथापि, आम्ही आमच्या ग्राउंड टीमला पुढील अपडेट्ससाठी प्रवाशांच्या संपर्कात राहण्याची सूचना केली आहे", असं एअर इंडियानं सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.