Air India Case : विमानात महिलेच्या अंगावर लघवी करणाऱ्या मुंबईच्या मिश्राला कर्नाटकात अटक

एअर इंडियाच्या विमानात महिला सहप्रवाशावर लघवी केल्या प्रकरणातील आरोपी शंकर मिश्रा आणखी अडचणीत सापडला आहे.
Air India Case
Air India Caseesakal
Updated on
Summary

दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केलीये. या घटनेप्रकरणी पोलिसांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना समन्स बजावला आहे.

Air India Case : एअर इंडियाच्या विमानात (Air India Flight) महिला सहप्रवाशावर लघवी केल्या प्रकरणातील आरोपी शंकर मिश्रा आणखी अडचणीत सापडला आहे. ताज्या बातमीनुसार, मुंबईचा रहिवासी असलेल्या शंकर मिश्राला बंगळुरू येथून अटक करण्यात आलीये.

यापूर्वी शंकरला त्यांच्या कंपनीनं कामावरून काढून टाकलं होतं. पोलिसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनाही बोलावलं आहे. नवा खुलासा असा आहे की, शंकर मिश्रानं (Shankar Mishra) महिलेला 15 हजार रुपयांची भरपाई दिली होती, जी तिच्या कुटुंबीयांनी परत केलीये.

Air India Case
Air India Case : विमानात महिलेच्या अंगावर लघवी करणाऱ्याचा Photo आला समोर; आरोपी बड्या कंपनीत आहे उपाध्यक्ष!

शंकर मिश्राच्या वकिलांनी सांगितलं की, 'हे प्रकरण समोर आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये व्हॉट्सअॅपवर संभाषण झालं होतं. महिलेच्या वतीनं तिची मुलगी बोलली. दारूच्या नशेत घडलेल्या या घटनेनंतर मिश्रानं महिलेच्या सर्व वस्तू साफ ​​केल्या होत्या. शंकर मिश्रांनी 28 नोव्हेंबरला महिलेचे कपडे आणि पिशव्या स्वच्छ करून 30 नोव्हेंबरला तिच्या घरी पाठवल्या. तेव्हा महिलेनं स्पष्टपणे सांगितलं होतं की, या प्रकरणाचा पुढं पाठपुरावा करणार नाही आणि तक्रारही करणार नाही.'

Air India Case
Mexico Violence : ड्रग्ज तस्कराच्या अटकेनंतर मेक्सिकोत भीषण हिंसाचार; वाहनं, विमानतळांवर मोठा गोळीबार

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केलीये. या घटनेप्रकरणी पोलिसांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना समन्स बजावला आहे. वैमानिक आणि सहवैमानिकांसह एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी बोलावलं होतं, मात्र ते हजर झाले नाहीत. आता त्यांना 7 जानेवारी रोजी पोलीस उपायुक्त (विमानतळ) यांच्या कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. पोलिसांनी बुधवारी एफआयआर नोंदवला असून आरोपी प्रवाशाला पकडण्यासाठी अनेक पथकं तयार केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()