Air India: 'ती' मोठी चूक एअर इंडियाला भोवली, क्रू मेंबरवरून DGCA ने दिला दणका; नेमकं काय घडलं?

DGCA News: डीजीसीएने कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढत ही अतिशय गंभीर चूक झाल्याचं म्हटलं आहे. हे प्रकरण एअर इंडियाकडून १० जुलै २०२४ रोजी मिळालेल्या वोलंड्री रिपोर्टच्या माध्यमातून डीजीसीएला समजलं.
Air India Air Hostess
Air India Air HostessEsakal
Updated on

DGCA Fines Air India: नॉन क्वालिफाईड क्रू मेंबर्ससोबत फ्लाईट ऑपरेट केल्याच्या कारणावरुन टाटा समूहाच्या एअर इंडिया या विमान कंपनी विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. डीजीसीएने एअर इंडियावर ९० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय एअर इंडियाच्या डायरेक्टर ऑपरेशन्सवर ६ लाख रुपये आणि डायरेक्टर ट्रेनिंगवरही ३ लाख रुपयांचा दंड लावण्यात आलेला आहे.

Directorate General of Civil Aviation अर्थात DGCA ने फ्लाईटच्या पायलटला इशारा दे म्हटलं की, भविष्यात अशी चूक झाली नाही पाहिजे. त्यांनी म्हटलं की, एअर इंडिया लिमिटेडने एक फ्लाईट ऑपरेट केलं, त्याला नॉन ट्रेनर लाईन कॅप्टनसोबत नॉन-लाईन-रिलीज्ड फर्स्ट ऑफिसरने कमांड केलं.

Air India Air Hostess
Sharad Pawar: मुख्यमंत्रीपदासाठी आमच्याकडे कुणाला रस नाही; शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट, चेंडू काँग्रेसच्या कोर्टात

डीजीसीएने कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढत ही अतिशय गंभीर चूक झाल्याचं म्हटलं आहे. हे प्रकरण एअर इंडियाकडून १० जुलै २०२४ रोजी मिळालेल्या वोलंड्री रिपोर्टच्या माध्यमातून डीजीसीएला समजलं.

रेग्युलेटरने प्रकरणाचं गांभीर्य ओळखून एअर इंडियाच्या ऑपरेशन्सचा पूर्ण तपास करुन कागदपत्रांची पडताळणी केली. याशिवाय एअर इंडिया शेड्यूलिंग फॅसिलिटी स्पॉट चेक केली. तपासणीनंतर प्रथमदर्शनी अनेक टप्प्यावर कमतरता जाणवली. काही पोस्ट होल्डर्स आणि स्टाफकडून रेग्युलेटरी नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे एअर इंडिाला दंड ठोठावण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.