Air India विमानात चाललंय काय? दारूच्या नशेत प्रवाशानं 8 वर्षांच्या मुलीसोबत केलं होतं 'हे' घाणेरडं कृत्य

एअर इंडिया विमानातलं लघवी प्रकरण सध्या चर्चेत आहे.
Air India Aircraft
Air India Aircraftesakal
Updated on

नवी दिल्ली : एअर इंडिया विमानातलं (Air India Aircraft) लघवी प्रकरण सध्या चर्चेत आहे. याशिवाय, एअर इंडियामध्ये प्रवाशानं गैरवर्तन केल्याची दुसरी घटना सप्टेंबरमध्ये घडली होती.

शनिवारी एअर इंडियानं सांगितलं की, 'सप्टेंबरमध्ये मुंबई-लंडन विमानात अशीच एक घटना घडली होती. यानंतर गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशाला महानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. प्रवासी दारूच्या नशेत होता आणि त्यानं आठ वर्षांच्या मुलीला अनुचित स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता.'

Air India Aircraft
Air India Urination Case : ..तर 'ही' घटना टाळता आली असती; Air India च्या सीईओंचं मोठं वक्तव्य

हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 5 सप्टेंबर रोजी घडली. मुलीची आई आणि 20 वर्षीय भावाच्या तक्रारीनुसार, आम्ही फ्लाइट AI-131 मधून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान एका मद्यधुंद प्रवाशानं मुलीला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मात्र, DGCA (Directorate General of Civil Aviation) च्या अधिकाऱ्यांनी या घटनेची कोणतीही माहिती दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Air India Aircraft
VIDEO : राष्ट्रगीत सुरू असतानाच 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी केली पँटेत लघवी; 6 पत्रकारांना अटक

एअर इंडियाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, विमान लँडिंग झाल्यानंतर आरोपीला मेट्रोपॉलिटन पोलिसांनी फ्लाइटमधून बाहेर काढलं. त्यानंतर एअर इंडियाच्या केबिन क्रूनं मेट्रोपॉलिटन पोलिसांना एक निवेदन दिलं आणि या घटनेची माहिती 19 सप्टेंबर 2022 रोजी डीजीसीएला दिली. 5 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई-लंडन फ्लाइटमध्ये ही घटना घडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.