नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानानं उड्डाण घेतल्यानंतर एका पॅसेंजरच्या स्मार्टफोनचा स्फोट झाल्यानं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आहे. विमानात धूर दिसून आल्यानं पायलटनं विमानं लँड करण्याचा निर्णय घेतला. नंतर संपूर्ण विमानाची तपासणी केल्यानंतर तसेच अडचण दूर केल्यानंतर पुन्हा विमानानं टेकऑफ केलं. (Air India flight makes emergency landing after cell phone explodes)
इमर्जन्सी लँडिंगनंतर एअर इंडियाच्या विमानानं तासाभरातच उदयपूर इथून पुन्हा उड्डाण केलं. गेल्या महिन्यात २१ जून रोजी इंडिगोच्या 6E 2134 या विमानानं दिल्लीहून डेहराडूनच्या दिशेनं उड्डाण केलं होतं. (Latest Marathi News)
पण विमानात काहीतरी गडबड झाल्यानंतर या विमानाचं काही वेळातच पुन्हा दिल्ली विमानतळावर लँडिंग झालं होतं. या विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यानं विमानानं वॉर्निंग सिग्नल दिल्यानं हे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं, अशी माहिती इंडिगोकडून देण्यात आली होती. (Marathi Tajya Batmya)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.