TMC Attack On Air India Passenger Urinating : एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटदरम्यान एका प्रवाशाकडून महिला प्रवाशावर लघवी करण्याच्या प्रकरणावर टीमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी भाष्य केले आहे.
हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड
महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी करणाऱ्या प्रवाशावर एअर इंडियाकडून ३० दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या कारवाईची खिल्ली मोईत्रा यांनी उडवली आहे. याबाबत त्यांनी एक ट्वीट केले आहे.
मोईत्रा यांनी या कारवाईची तुलना कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर अनेक विमान कंपन्यांनी घातलेल्या सहा महिन्यांच्या बंदीशी केली. कामरा यांनी एअर इंडियाच्या विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी वाद घालत त्यांना भित्रा असे संबोधले होते.
त्यानंतर नुकतेच एका प्रवाशाने महिला प्रवाशाच्या अंगावर प्रवासादरम्यान लघवी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर एअर इंडियाकडून संबधित प्रवाशावर केवळ ३० दिवसांची प्रवास बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईवर मोईत्रा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
मोईत्रा यांनी केलेल्या या ट्वीटमध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयालादेखील (DGCA) टॅग केले आहे. तसेच प्रवासादरम्यान गोस्वामी यांच्यासोबत वाद घालणाऱ्या कामरांना विविध कंपन्यांनी सहा महिन्यांसाठी प्रवास बंदी केली होती. मात्र, महिलेच्या अंगावर करण्यात आलेल्या घृणास्पद कृत्याबद्दल एअर इंडियाकडून केवळ ३० दिवसांची प्रवास बंदी घालण्यात आली आहे.
कामरांकडून ताशेरे
दुसरीकडे महिलाप्रवाशासोबत करण्यात आलेल्या या कृत्यावर कामरा यांनीदेखील ताशेरे ओढले आहेत. यावेळी त्यांनी २०२० मध्ये त्यांच्यावर बंदी घालण्याची माहिती देणार्या एअरलाइन्सच्या ट्विटचा स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.