एअर इंडिया प्रकरणात डीजीसीएनं एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावलीये.
एअर इंडिया प्रकरणातील (Air India Case) पीडितेनं शंकर मिश्राच्या (Shankar Mishra) आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. शंकर मिश्राच्या वकिलानं कोर्टात सांगितलं होतं की, 'पीडितेनं स्वतः तिच्या सीटवर लघवी केली होती.'
त्यावर आता पीडितेचं वक्तव्य समोर आलंय. पीडितेनं हे आरोप खोटे आणि अपमानास्पद असल्याचं म्हटलंय. शंकर मिश्रावर एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये दारूच्या नशेत एका वृद्ध महिलेच्या सीटवर लघवी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर शंकर मिश्राला अटक करण्यात आली. आता शंकर मिश्राच्या वकिलानं कोर्टात सांगितलं की, 'पीडितेनंच स्वतः तिच्या सीटवर लघवी केलीये.'
वकिलानं स्पष्ट केलं की, पीडित महिला गेल्या 30 वर्षांपासून भरतनाट्य करत आहे. त्यामुळं तिला मूत्रमार्गात असंयम असणं सामान्य आहे. मिश्राच्या या दाव्यावर महिलेनं तिच्या वकिलामार्फत निवेदन जारी केलंय. यामध्ये महिलेनं म्हटलंय की, "आमच्या लक्षात आलंय की, पटियाला हाऊस कोर्टात आरोपीच्या वतीनं माझ्याविरुध्द बदनामीकारक आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप पूर्णपणे खोटे आणि अत्यंत अपमानास्पद आहेत. आपल्या मूर्खपणाच्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करण्याऐवजी, आरोपी पीडितेला त्रास देण्यासाठी त्याच्याविरुद्ध दिशाभूल करणारी मोहीम चालवत आहे."
विशेष म्हणजे, एअर इंडिया प्रकरणात डीजीसीएनं एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावलीये. नोटिसीमध्ये, डीजीसीएनं एअर इंडियानं या प्रकरणाची चुकीची हाताळणी केल्याचा दावा केलाय. 26 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या न्यूयॉर्कहून नवी दिल्लीच्या फ्लाइटमध्ये आरोपी शंकर मिश्रानं पीडित महिलेच्या सीटवर कथितपणे लघवी केली होती. या प्रकरणी पीडितेनं तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी शंकर मिश्राला यापूर्वी बंगळुरू येथून अटक केली होती. त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.