मुंबई तसेच दिल्लीतील वाढलेलं हवा प्रदूषण हे मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहे. देशाची राजधानी दिल्लीत सध्या सगळीकडे विषारी धुक्याचा थर पाहायला मिळत आहे. येथील हवेची गुणवत्ता ही गंभीर श्रेणीमध्ये पोहचली आहे. दरम्यान स्विस ग्रुप IQAir च्या आकडेवारीनुसार, देशाची राजधानी दिल्ली, कोलकाता आणि मुंबई ही शहरे आज जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक बनली आहेत.
आज सकाळी 7.30 वाजता नवी दिल्ली पुन्हा 483 आयक्यूआयसह या यादीत अव्वल स्थानावर आहे . यानंतर पाकिस्तानातील लाहोर हे शहर 371 वर राहिले. तर अनुक्रमे 206 आणि 162 च्या AQI सह वायू प्रदूषणाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या पाच शहरांमध्ये कोलकाता आणि मुंबई देखील आहेत.
आज भारतातील दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. दिल्लीतील एक्यूआय 483 वर कायम आहे. पाकिस्तानचे लाहोर दुसऱ्या क्रमांकावर आहे, लाहोरचा एक्यूआय 371 वर नोंदवला गेला आहे. भारतातील कोलकाता शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे एक्यूआय 206 आहे.
चौथ्या क्रमांकावर बांगलादेशचे ढाका शहर आहे, जिथे एक्यूआय 189 आहे. यादीत पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचे कराची शहर असून जेथे एक्यूआय 162 आहे. भारतातील मुंबई शहर यादीत सहाव्या स्थानावर आहे, जिथे त्याचा एक्यूआय 162 आहे. चीनचे शेनयांग शहर यादीत सातव्या स्थानावर आहे, जेथे एक्यूआय 159 आहे. चीनचे हांगझोऊ शहर आठव्या क्रमांकावर आहे, त्याचा एक्यूआय 159 आहे. कुवेत सिटी आठव्या क्रमांकावर आहे, जिथे एक्यूआय 155 आहे. शेवटी, चीनचे वुहान शहर 10 व्या क्रमांकावर आहे, जिथे त्याचा एक्यूआय 152 आहे.
कमी तापमान, वाऱ्याचा अभाव आणि शेजारील राज्यांमध्ये शेतातील स्टबल जाळणे यामुळे वायू प्रदूषण वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नवी दिल्लीच्या 20 दशलक्ष रहिवाशांपैकी अनेकांनी डोळे जळजळणे आणि घसा खाजत असल्याची तक्रारी आढळत आहेत, काही मॉनिटरिंग स्टेशनवर एक्यूआय 550 वर गेल्याने हवेचा रंग देखील बदलला आहे. 0-50 चा एक्यूआय चांगला मानला जातो तर 400-500 मधील एक्यूआय नागरिकांसाठी धोकादायक मानला जातो.
सूक्ष्म कण ज्यांना PM2.5 म्हणून ओळखले जाते. त्याची घनता 523 मिलीग्राम प्रति घनमीटर होती, जी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा 104.6 पट जास्त आहे. जे मानवी केसांपेक्षा 30 पट पातळ असतात आणि फुफ्फुसातून रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात.
वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीत बांधकामाचे काम थांबवण्यात आले आहे. त्यांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास आणि शक्यतो घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.