Delhi Air Pollution: पुन्हा वाढलं राजधानी दिल्लीतील प्रदूषण; कित्येक भागांमध्ये AQI ४०० पार! कुठे काय स्थिती?

राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत चालली आहे.
Delhi Air Pollution
Delhi Air PollutionEsakal
Updated on

राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत चालली आहे. लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी, दिल्लीतील वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) 300 च्या खाली घसरला होता, आता दिवाळीनंतर तो पुन्हा वाढून मंगळवारी 400 च्या पुढे गेला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, संपूर्ण दिल्लीतील हवेची गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीत आहे. AQI आनंद विहारमध्ये 430, आरके पुरममध्ये 417, पंजाबी बागेत 423 आणि जहांगीरपुरीमध्ये 428 होता.

तज्ज्ञांचे माहितीनुसार, उत्तर-पश्चिम दिशेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे प्रदूषित कण वातावरणात पसरू शकत नाहीत, त्यामुळे प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. थंड वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान कमी होणार असून, त्यामुळे येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी दिल्लीत वारे शांत राहिले ज्यामुळे प्रदूषणाचे कण पसरू शकले नाहीत. त्याचवेळी उत्तर-पश्चिम दिशेकडून वाहणाऱ्या थंड मध्यम वाऱ्याने परिस्थिती आणखी वाईट झाली. सकाळी अंशत: ढगाळ वातावरण होते. बुधवारीही परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा नाही.

Delhi Air Pollution
Air Purifier : प्रदूषणावर मात करण्यासाठी एअर प्युरिफायर घेतलाय.. पण दिवसभर चालू ठेवणं गरजेचं आहे का?

दिल्लीवरील मुख्य वारे उत्तर-पश्चिम/ईशान्य दिशांनी येण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी चार किमी असू शकतो. सकाळी आकाश निरभ्र असेल आणि हलके धुके पडेल ज्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढेल. तर गुरुवारी सकाळी आकाश निरभ्र होईल. दिल्लीतील मुख्य पृष्ठभागाचे वारे पूर्वेकडून हलक्या धुक्यासह ताशी आठ किमी वेगाने वाहू शकतात.

Delhi Air Pollution
Yoga For Pollution: वायुप्रदूषणामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी ही योगासने करत राहा; श्वासासंबंधीच्या अनेक समस्या होतील दूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.