नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोनच्या माध्यमातून होणारा दहशतवादी हल्ल्याचा कट उघड झाल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या आहेत. या नव्या आव्हानाशी दोन हात करण्यासाठी भारतीय सैन्याने एअर डिफेन्स कमांडची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. 'इंडिया टुडे'शी बोलताना सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी म्हटलंय की, आम्ही मॅरिटाईम कमांड आणि एअर डिफेन्स कमांड बनवणार आहोत.
पुढे ते म्हणाले की, एअर डिफेन्स कमांडची जबाबदारी आपल्या एअरस्पेसला सुरक्षित ठेवण्याची असेल. एअर डिफेन्स कमांड सर्व एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर अथवा ड्रोनवर लक्ष ठेवेल. ते म्हणाले की, जम्मू एअरबेसवर ड्रोन हल्ल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि आता एका कमांडरची जबाबदारी संपूर्ण एअरस्पेसची सुरक्षा करणे असेल.
ते म्हणाले की, हिंदी महासागरामध्ये धोका वाढतोय. या धोक्याला नेस्तनाबूत करण्यासाठी मॅरिटाईम कमांडची स्थापना केली जाईल. मॅरिटाईम कमांडची जबाबदारी भारतीय सागर क्षेत्राची सुरक्षा राखण्याची असेल.
दुसऱ्या देशांची ताकद वाढण्याआधीच आपल्याला आपल्या सागरी क्षेत्राची सुरक्षितता वाढवायला हवी. सागरी सुरक्षेसाठी अनेक विभाग तैनात आहेत, यामध्ये राज्य तटरक्षक, इंडियन नेव्हीसहित इतर अनेक एजन्सीज आहेत. सोबतच मच्छीमार देखील आपल्याला मदत करतात. मॅरिटाईम कमांड या सगळ्यांचा समन्वय साधेल.
माध्यमांतील माहितीनुसार, एअर डिफेन्स कमांड 15 ऑगस्टपासून सुरु केलं जाईल. हे भारतीय वायुसेना, सेना आणि नौसेनेच्या संसाधनांना नियंत्रित करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.