नवी दिल्ली : विमानांत वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे दर (एटीएफ) १.३ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वतीने आज जाहीर करण्यात आला. सध्या हे दर विक्रमी पातळीवर आहेत. यंदाच्या वर्षात ६२ टक्के दरवाढीनंतर त्यात प्रथमच कपात करण्यात आली आहे . इंडियन ऑईलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १.३ टक्क्यांनी घटविल्यावर एटीएफचे नवे दर १.२१ लाख रुपये प्रती किलोलिटर होणार आहेत. यामुळे विमान कंपन्या हवाई तिकीट दर लगेच कमी करणार की नाही याबाबतचे चित्र स्पष्ट नसले तरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वतीने इंधन दरकपात करून प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय जाहीर झाला आहे.
सध्या हे दर १.२३ लाख प्रती किलोलिटर आहेत. त्यात प्रती किलोलिटरमागे १५६४ रुपयांची कपात करण्यात आल्याने दिल्लीतील एटीएफचे नवे दर १ लाख २१ हजार ४७५.७४ रुपये होतील. सरकारी तेल कंपन्या दरमहा दोनदा (१ व १६ तारखेला) विमान इंधनाच्या किमतींचा फेरआढावा घेतात. यावर्षी जानेवारीनंतर यात वाढ करण्यात आल्याने एटीएफ ६२ टक्क्यांनी महागले होते. अर्थात सर्वसामान्य देशवासीयांशी याचा काही थेट संबंध नसल्याने या दरवाढीची फारशी चर्चा होत नाही. यापूर्वी १६ मे रोजी एटीएफचे दर ५ टक्क्यांनी म्हणजे १६८८ रुपयांनी आले होते. त्यानंतर मुंबईत हे दर सुमारे १ लाख २२ हजार रुपये प्रतिलिटर झाले होते.
चार महानगरांतील दर (प्रति किलोलिटर : लाख रुपये)
मुंबई : १,२०, ३०६.९९
दिल्ली : १,२१,४७५.७४
कोलकता : १,२६,३६०.९८
चेन्नई : १,२५,७२५,३६
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.