Delayed Flights:...तर एअरलाईन्सला रद्द करावी लागणार फ्लाईट; DGCA कडून मोठा बदल

Airlines may cancel flights delayed: विमान प्रवासासंबंधी गेल्या काही दिवसांत अनेक तक्रारी आल्या होत्या. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल अॅव्हिएशनने सोमवारी एसओपी जाहीर केल्या आहेत.
Airlines may cancel flights delayed beyond 3 hours Aviation body issues SOPs
Airlines may cancel flights delayed beyond 3 hours Aviation body issues SOPs
Updated on

नवी दिल्ली- विमान प्रवासासंबंधी गेल्या काही दिवसांत अनेक तक्रारी आल्या होत्या. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल अॅव्हिएशनने सोमवारी एसओपी जाहीर केल्या आहेत. फ्लाईटला तीन तासांपेक्षा जास्त काळ उशीर होणार असेल तर ती फ्लाईट रद्द करण्याच्या सूचना एअरलाईन्स कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. (Airlines may cancel flights delayed beyond 3 hours Aviation body issues SOPs)

धुके किंवा इतर कारणांमुळे फ्लाईटला उशीर होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. असा प्रसंग ओढावल्यास प्रवाशांचा खोळंबा होतो. शिवाय मनस्ताप वेगळाच सहन करावा लागतो. यासंदर्भात प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावर तोडगा म्हणून DGCAने नवा नियम आणला आहे. याअंतर्गत विमानाला तीन तासांपेक्षा जास्त उशीर होण्याची शक्यता असेल. तर अशा परिस्थितीत एअरलाईन्सला फ्लाईट रद्द करावी लागणार आहे.

Airlines may cancel flights delayed beyond 3 hours Aviation body issues SOPs
हृतिक अन् दीपिकाची पहिलीच 'फ्लाईट' अन् वातावरण...

DGCA च्या नव्या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण अनेकदा प्रवाशांना फ्लाईटसाठी १० ते १५ तासांपर्यंत वाट पाहावी लागते. अशावेळी विनाकारण मनस्तापाला सामोरे जावे लागते. शिवाय प्रवाशांना आपली वेगळी सोयही तात्काळ करण्याचा निर्णय घेता येत नाही. त्यामुळे नव्या निमयांमुळे प्रवाशांचा प्रवास थोडासा सुखकर होण्याची शक्यता आहे.

Airlines may cancel flights delayed beyond 3 hours Aviation body issues SOPs
विमान प्रवासात मोबाइल फ्लाईट मोडवर का ठेवतात? : Airplane Travel

DGCA ने काय सांगितलं!

फ्लाईटला उशीर होणे, रद्द होणे किंवा कोणत्याही सूचनेशिवाय अधिकचा वेळ फ्लाईटसाठी लागणे अशा परिस्थितीत प्रवाशांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना DGCA ने दिल्या आहेत. याकाळात एअरलाईन्सने प्रवाशांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात असं DGCA ने म्हटलंय. नवे नियम एअरलाईन्स कंपन्यांना बंधनकारक असणार आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली सारख्या शहरात धुक्यांमुळे किंवा वातावरणीय परिस्थितीमुळे फ्लाईट रद्द किंवा उशिरा कार्यरत कराव्या लागत होत्या. प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला होता. एअरलाईन्सला आता नव्या नियमाची माहिती तिकीटावर द्यावी लागणार आहे. शिवाय फ्लाईटच्या सद्यस्थितीची अचूक माहिती आपल्या वेबसाईटवर द्यावी लागणार आहे. तसेच यासंदर्भात प्रवाशांना एसएमएस, ईमेल द्वारे अवगत करावे लागणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.