Airlines in India: स्वस्तात विमान सेवा देणाऱ्या GoFirst Airlines ने स्वतःला दिवाळखोर घोषित केले आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) नेही याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. गो फर्स्ट अगोदर किंगफिशर एअरलाइन्स आणि जेट एअरवेज अशी नावे आहेत ज्यांच्या बंद होण्याची माहिती आपल्याला आहे.
पण तुम्हाला माहित आहे का की देशात आतापर्यंत 10 हून अधिक एअरलाईन्स बंद झाल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात.
1981 मध्ये देशात प्रादेशिक विमानसेवा सुरू झाली. त्याचे नाव होते 'वायुदूत'. ही विमानसेवा एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सने संयुक्तपणे सुरू केली होती. ती मुख्यत्वे देशाच्या ईशान्येकडील भागात सुरु होती. ही कंपनी सुमारे 30 ठीकानांवर आपली विमानसेवा चालवत होती, परंतु ती 1997 मध्ये बंद झाली.
जेट एअरवेजने एअर सहाराला विकत घेतले:
सहारा इंडिया समूहाने 1993 मध्ये प्रवासी आणि मालवाहू विमान सेवा सुरू केली. सन 2000 मध्ये, ते एअर सहारा म्हणून पुन्हा ब्रँड केले गेले. त्या काळात ही देशातील सर्वात मोठी विमानसेवा होती. पण 2006 पर्यंत देशात अनेक स्वस्त विमानसेवा विमान कंपन्या आल्या आणि एअर सहारा बंद पडली.
2007 मध्ये, एअर सहारा जेट एअरवेजने विकत घेतले आणि त्याचे नाव बदलून जेट लाइट ठेवले. सहारा एअरलाइन्सप्रमाणे जेट एअरवेजचीही सुरुवात 1993 मध्ये झाली. देशातील खाजगी क्षेत्रातील ही एकमेव पूर्ण वाहक सेवा होती, परंतु 2019 मध्ये तिची सेवा बंद झाली.
देशातील पहिली खाजगी विमानसेवा:
1991 च्या आर्थिक सुधारणांदरम्यान सरकारने विमान वाहतूक क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले केले. त्यानंतर देशातील पहिली खासगी विमानसेवा ईस्ट-वेस्ट बनली. त्याचे ऑपरेशन 1992 मध्ये सुरू झाले. सुरुवातीला या एअरलाइन्स खाजगी चार्टर विमाने चालवत असत.
परंतु 1994 मध्ये त्यांना शेड्यूल्ड एअरलाइन्सचा दर्जा मिळाला. 1995 मध्ये कंपनीचे चेअरमन तकीउद्दीन वाहिद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरातच ही कंपनी मोठ्या कर्जामुळे बंद झाली.
मोदीलफ्ट एअरलाईन्स:
आज आपल्या सर्वांना स्पाइसजेट बद्दल माहिती आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की ज्या कंपनीची मालमत्ता स्पाइसजेटने खरेदी केली होती त्याचे नाव मोदीलफ्ट होते. ते जर्मनीच्या लुफ्थान्सा या विमान कंपनीने विकत घेतले आणि भारतातील उद्योगपती एस. मोदींनी 1993 मध्ये सुरुवात केली.
परंतु दोन कंपन्यांमध्ये फंडिंगच्या मुद्द्यावर वाद झाला, ज्यामुळे या एअरलाइन्स केवळ 3 वर्षांत म्हणजे 1996 मध्ये बंद झाल्या. स्पाइस जेटची सुरुवात 2004 मध्ये झाली.
दमानिया एअरलाईन्स:
देशात अनेक खासगी विमानसेवा सुरू करण्यात परवेझ दमानिया आणि विस्पी दमानिया बंधूंचे नाव कोण विसरेल. दोन्ही भावांनी मिळून 1993 मध्ये दमानिया एअरलाईन्स सुरू केली, जी 1997 मध्ये बंद झाली. पण तुम्हाला माहित आहे का की एअर सहारा स्थापन करण्यात परवेझ दमानिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
पुढे ते किंगफिशर एअरलाइन्सचे कार्यकारी संचालकही झाले. तर विस्पी दमानिया देखील नंतर किंगफिशर एअरलाइन्सचे उपाध्यक्ष बनले. किंगफिशरने 2012 मध्ये विमानसेवेचे कामकाज बंद केले.
विमान कंपन्यांना पेगासस नाव:
आजकाल, पेगासस संदर्भात देशात अनेकदा राजकीय गदारोळ होतो. पण अनेक वर्षांपूर्वी देशात या नावाची प्रादेशिक विमानसेवा होती. बंगळुरूमधील केंम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा त्याचा तळ होता. या एअरलाइन्स 2015 मध्ये सुरू झाल्या आणि फक्त एक वर्ष चालल्यानंतर 2016 मध्ये बंद झाल्या.
याशिवाय, देशातील बंद पडलेल्या प्रादेशिक एअरलाइन्सपैकी एक अर्चना एअरवेज होती, जी 1993 ते 2000 पर्यंत दिल्लीत होती आणि जवळपासच्या मार्गांवर सेवा देत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.