Airport Facility : दररोज लाखो लोकं विमानाने प्रवास करतात पण अनेकदा विमानाने प्रवास करताना प्रवाशांना मिळणाऱ्या फॅसिलिटीज संदर्भात अनेक लोकांना माहिती नसतं. अशात तुम्हाला विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांना मिळणाऱ्या एका भन्नाट ऑफरविषयी सांगणार आहोत.
ही ऑफर फार कमी लोकांना माहिती असेल की एअरपोर्टवर फ्री जेवण मिळतं. हो, हे खरंय. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
एअरपोर्टवर मिळतं फ्री जेवण
जर तुमच्याकडे स्पेसिफीक डेबिट कार्ड किंवा क्रेडीट कार्ड असेल आणि तुम्ही विमानाने प्रवास करत असाल तर तुम्ही एअरपोर्टवर फ्री जेवणाचा लाभ घेऊ शकता.
जगभरातील कोणत्याही डोमेस्टीक - आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या लाऊंजमध्ये तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
एअरपोर्टवर फ्री जेवणाचा लाभ घेण्यासाठी काय करावं?
या साठी तुम्हाला एअरपोर्ट लाऊंजमध्ये जाऊन तुमचं विमानाचं तिकीट दाखवायचं असतं
कार्ड स्वाईप झाल्यावर तुमच्या पेमेंट नेटवर्कला हे ट्राजेंक्शन एअरपोर्ट लाऊंजमधून झाल्याचं समजेल.
कार्ड ट्राजेंक्शन अप्रुव झाल्यावर लाऊंजमधील फ्री जेवणाचा तुम्हीही आस्वाद घेऊ शकता.
ही ऑफर कोणत्या डेबिट आणि क्रेडीट कार्डवर आहे?
ICICI bank Coral Paywave Debit Card
Access limit- 2/quarter
ICICI bank Rubyx Debit Card
Access limit- 2/quarter
Debit card of Central bank of India
Access limit- 2/quarter
SBI Platinum Debit Card
Access limit- 2/quarter
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.