"अजित पवार गटाने खोटी कागदपत्रं दिली, मृत व्यक्तींची..."; शरद पवार गटाच्या वकिलांनी मांडले ५ मुद्दे...

sharad pawar news
sharad pawar news
Updated on

राष्ट्रवादी कुणाची, याबाबत निवडणूक आयोगात दोन तास सुनावणी झाली. आज अजित पवार गटाने त्यांची बाजू मांडली तर शरद पवार गटाने अजित पवार गटाचे मुद्दे खोडून काढले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज निवडणूक आयोगात हजर होते. सुनावणीनंतर शरद पवार गटाच्या वकीलांनी माध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी काय म्हणाले?

  • दोन तास सुनावणी झाली. आम्ही दोन मुद्दे मांडले. आम्हाला न ऐकता पक्षात वाद आहे हे सिद्ध करु नका.

  • दुसरा गटाचा युक्तिवाद संपले तेव्हा आम्हाला बाजू मांडण्याची संधी मिळेल. कोणीही खोट पुरावे घेऊन पक्षावर दावा करु शकत नाही.

  • आम्ही प्राथमिक पुरावे दिले आहेत. सुनावणी वेळे आणखी पुरावे देऊ.

  • मृत व्यक्तींचे पुरावे सादर करण्यात आले. अजित पवार गटाने खोटी कागदपत्र सादर केली.

  • आमचं एकून न घेता निर्णय घेणे चुकीचं आहे. राष्ट्रवादी पक्षाचा चेहरा शरद पवार हेच आहेत, असे शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.

sharad pawar news
NCP Crisis: "शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात"; अजित पवार गटाचा निवडणूक आयोगात गंभीर आरोप

निवडणूक आयोगात आज अजित पवार गटाने त्यांची बाजू मांडली. यावेळी त्यांनी शरद पवार गटावर गंभीर आरोप केले. शरद पवार स्वत:च्या मर्जीनुसार पक्ष चालवतात. जयंत पाटील यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती देखील चुकीची आहे, असे अजित पवार गटाचे वकील आयोगात म्हणाले.

sharad pawar news
NCP Crisis : राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता; शरद पवार गटाने तातडीने घेतली 'ही' भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.