Ajit Pawar: गुवाहटीच्या वाटेवर लक्ष ठेवा, कुछ तो गडबड है…अजित पवार नाराज? काळेंच्या ट्विटमुळे चर्चा

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा वारंवार सुरू असतात
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबीरात उपस्थित राहिले. अवघ्या राज्यासाठी त्यांची उपस्थिती लधवेधी ठरली. हाताला पट्ट्या असताना आणि उपचार सुरू असताना एका दिवसासाठी ते कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी ते शिबिराला गेले. त्यांच्या या प्रबळ इच्छेची चर्चा झालीच पण आणखी एका गोष्टीची चर्चा सुरू झाली ती म्हणजे अजित पवार यांच्या अनुपस्थितीची. हाच मुद्दा समोर ठेवत मनसे नेते गजानन काळे यांनी एक ट्विट केलं आहे.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा वारंवार सुरू असतात. परंतु आजचं हे चित्र अधिक बोलकं असून आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड आहे, असं सांगणारं असल्याचं ट्विट गजानन काळे यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर राहतील, असं बोललं जात होतं. मात्र न्यूमोनिया झाला असताना, हाताचे बँडेज घेऊन शरद पवार थेट हेलिकॉप्टरने शिर्डीत पोहोचले.त्यांनी पाच मिनिटं भाषणही केलं. शिर्डीतील मंथन शिबीरात राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन 100 चा नारा दिला आहे. शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आदी दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.

गजानन काळे यांनी ट्विटमद्धे लिहलं आहे की, ‘आदरणीय पवार साहेब तब्येत ठीक नसतांना राष्ट्रवादीच्या शिबिरात येतात व अजितदादा बरोबर त्याच वेळी वैयक्तिक कारण सांगून अनुपस्थित राहतात. ही बाब काही पचनी पडत नाही. तसेही दादा विरोधी पक्षनेते म्हणून शांत आहेत काही दिवसांपासून…. गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून रहा रे. कूछ तो गडबड हैं. काले यांच्या या ट्विटमुळे आता पुन्हा अजित पवार नाराज आहेत की मागच्या वेळी सारखे काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Ajit Pawar
अजित पवार नाराज? राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला दुसऱ्या दिवशी गैरहजर

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यक्रमात अजित पवार नाराज होऊन निघून गेले होते. मात्र त्यावेळी आपण नाराज नसून लघुशंकेला गेलो होतो, असं ते म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराच्या आज दुसरा दिवस असूनही अजित पवार मेळाव्याला आलेले नाहीत.

अशातच काही भाजपचे नेते असा दावा करतात की, राष्ट्रवादीचे काही नेते आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे चर्चाना वेग आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.