नवी दिल्ली, ता.१६ (वृत्तसंस्था) ः देशाच्या विविध भागांमध्ये मागील तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणांवरून धमकीचे दूरध्वनी आल्याने तब्बल बारा विमानांच्या पूर्वनिर्धारित मार्गामध्ये बदल करावा लागल्याची बाब उघड झाली आहे. बंगळूरच्या दिशेने जाणाऱ्या ‘अकासा एअर’ आणि दिल्लीच्या दिशेने निघालेल्या ‘इंडिगो’च्या विमानाबाबत काहीसा असाच प्रकार घडला आहे.