उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका नियोजित वेळेवर होणार हे जवळपास निश्चित झालंय.
लखनऊ : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुका नियोजित वेळेवर (UP Election 2022) होणार हे जवळपास निश्चित झालंय. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता निवडणूक आयोगानं फेटाळून लावलीय. त्यामुळं आता सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी विविध प्रकाराची आश्वासनं देताना दिसताहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख (Samajwadi Party) अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी जनतेला मोफत वीज देण्याची घोषणा केलीय. 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यास, यूपीच्या सर्व वीज ग्राहकांना 300 युनिट मोफत (300 Units of Free Electricity) घरगुती वीज देण्याची घोषणा अखिलेश यांनी आज (शनिवार) केली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पक्ष कार्यालयात मोठ्या संख्येनं जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अखिलेश यादव म्हणाले, पक्षाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केलेलं हे पहिलं वचन आहे. यूपीच्या लोकांना माहितीय, की सपा आपल्या जाहीरनाम्यातील सर्व वचनांची पुर्ती करत असतो. त्यामुळं हेही वचन पूर्ण करेल. यूपीत विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बदलेल, त्या दिवसांपासून समाजवादी पक्ष जनतेच्या सेवेसाठी उभा असेल. सत्ताधारी भाजपनं (BJP Government) आपल्या चुकीच्या कारभारामुळं समाजातील सर्व घटकांचं जगणं मुश्किल बनवलंय, अशी त्यांनी टीका करत जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यकर्त्यांच्या प्रतिसादाच्या आधारे ही घोषणा करण्यात आलीय. जाहीरनाम्यात तळागाळातील जनतेच्या मागण्यांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पक्षानं जुलैमध्ये एक मोठी मोहीम सुरू केली. यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षानं आपल्या जाहीरनाम्यात काय समाविष्ट करावं, हे सुचवण्यास सांगितलं. यावर कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत विजेचे प्रति युनिट दर कमी करावेत, राज्यभरातील घरगुती ग्राहकांसाठी मर्यादित मोफत वीज द्यावी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज द्यावी, अशी सर्वसामान्यांची मागणी होती. त्यानंतर एसपी प्रमुखांनी वीज विभागाच्या आर्थिक बाबी लक्षात घेऊन अशा मागणीची व्यवहार्यता निश्चित करण्यासाठी आर्थिक तज्ञांशी चर्चा केली. शेवटी, सपा सरकार स्थापन झाल्यानंतर, यूपीच्या सर्व घरांना 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.