Akhilesh Yadav : कन्नौजमधून अखिलेश यादव निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता

सपने याआधी उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघातील उमेदवार बदलले आहेत.
अखिलेश यादव
अखिलेश यादव sakal media
Updated on

नवी दिल्ली ः समाजवादी पक्षाचे(सप) सर्वेसर्वा अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशातील कन्नौज मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. कन्नौजमध्ये सपने राष्ट्रीय जनता दलाचे(आरजेडी) नेते लालूप्रसाद यादव यांचे जावई तेजप्रताप यादव यांना उमेदवारी दिली असून त्यांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा आहे.

अखिलेश यादव
Nashik Crime News : ‘तपस्वी’ बंगला हडपण्यासाठी बिल्डरने दिली ‘सुपारी’! संशयित बिल्डरसह दोघांना अटक

सपने याआधी उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघातील उमेदवार बदलले आहेत. आता सपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कन्नौजमध्ये उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे. स्वतः अखिलेश यादव येथून अर्ज भरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी कन्नौजमधून निवडणूक लढविली होती. त्यावेळी भाजपच्या सुब्रत पाठक यांनी डिंपल यांचा १३ हजार मतांनी पराभव केला होता. पाठक यांना ५.६३ लाख तर डिंपल यांना ५.५० लाख मते मिळाली होती. सपचे दिग्गज नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर २०२२ साली मैनपुरी मतदारसंघात डिंपल यादव यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला होता. डिंपल या पुन्हा मैनपुरीतून नशीब आजमावत आहेत.

सपने आतापर्यंत गौतम बुध्द नगर, मिसरिख, बागवत, बिजनौर, संभल, मुरादाबाद, बदायू, रामपूर, मेरठ तसेच अन्य काही मतदारसंघातले उमेदवार बदलले आहेत. अखिलेश यादव यांनी स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरावे, असा पक्षाच्या नेत्याचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर अखिलेश निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.