उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी कन्नौज मतदारसंघातून अखिलेश यादव यांनी येथे विजयाची हॅट्ट्रीक केली आहे. आता अखिलेश तब्बल १२ वर्षांनंतर या जागेवर पुन्हा निवडणूक लढवली होती. त्यामुळे भाजपसमोर आव्हान निर्माण झाले होते. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार अखिलेश यांनी कन्नौजमधून बाजी मारली असून, त्यांनी 1 लाख 21 हजार मतांनी विजय मिळवला आहे.
सपाने पीडीएचा (मागास, दलित आणि अल्पसंख्याक) नारा दिला आहे. मात्र, येथील विजयाचा आधार नेहमीच माय (मुस्लिम आणि यादव) राहिला आहे. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांपासून भाजपने येथे सुब्रत पाठक यांना उमेदवारी दिली आहे. 2014 मध्ये सुब्रत पाठक येथून पहिल्यांदा लढले होते. तेव्हा डिंपल यादव यांनी त्यांचा पराभव केला होता. तर 2019 पाठक यांनी डिंपल यादव यांना धूळ चारली होती.
उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा जागा 1967 मध्ये अस्तित्वात आली. 1967 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत युनायटेड सोशालिस्ट पार्टीचे राम मनोहर लोहिया यांनी ही जागा जिंकली होती. शीला दीक्षित, अखिलेश यादव, डिंपल यादव आणि सुब्रत पाठक यांसारखे चेहरेही येथून निवडणूक जिंकले आहेत.
कन्नौज लोकसभा मतदारसंघात छिब्रामौ, तिरवा, कन्नौज, बिधुना, रसुलाबादसह 5 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात भाजप, सपा हे प्रमुख पक्ष आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुब्रत पाठक यांनी 12,353 मतांच्या फरकाने ही जागा जिंकली होती. त्यांना 49.00% मतांसह 563,087 मते मिळाली. त्यांनी समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांचा पराभव केला, त्यांना 550,734 मते (48.27%) मिळाली.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत डिंपल यादव यांनी ही जागा जिंकली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, डिंपल यादव यांना 43.89% मतांसह 489,164 मते मिळाली. भाजपचे उमेदवार सुब्रत पाठक यांना 469,257 मते (42.10%) मिळाली होती. डिंपल यादव यांनी सुब्रत पाठक यांचा १९,९०७ मतांनी पराभव केला होता.
गेल्या वीस वर्षांत कन्नौजला उड्डाणपूल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, सेंटर फॉर एक्सलन्स व्हेजिटेबल्स, सौ शैया हॉस्पिटल, गाय मिल्क प्लांट, थाठियाचे इत्रा पार्क, वोडका फॅक्टरी, १३२ केव्ही ट्रान्समिशन सेंटरची योजना मिळाल्या आहेत.
उत्तर प्रदेशातून समाजवादी पक्षाचे सरकार गेल्याबरोबर मिल्क प्लांट, थथियाचे परफ्युम पार्क, वोडका फॅक्टरी आणि विशिष्ट मंडईचे काम ठप्प झाले आहे. सौ शैया रुग्णालयात डॉक्टर नाहीत. येथील स्थानिक समस्या बटाटा आधारित उद्योग आणि औद्योगिक गॅस पाइपलाइन आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.