पाच राज्यांच्या निकालात भाजपला बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालंय. उत्तर प्रदेशात मतदारांनी भाजपला पुन्हा संधी दिली. तर, निवडणुकीत चर्चेत असणारे अखिलेश यादव यांना 125 जागा मिळाल्या. मागच्या परफॉर्मन्सपेक्षा यंदा समाजवादी पार्टीने चांगल्या जागा मिळवत सरशी केली असली, तरीही सत्ता मिळवण्यात त्यांना अपशय आलंय. (Akhilesh Yadav tweets on UP Assembly Election 2022)
दरम्यान, निकाल लागण्यापूर्वी अखिलेश यांनी ट्वीट केलं होतं. मात्र निकालानंतर त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. अखेर अखिलेश यांनी ट्वीट करत आधे से ज़्यादा भ्रम और छलावा दूर हो गया है बाकी कुछ दिनों में हो जाएगा, असं त्यांनी म्हटलंय. (Akhilesh Yadav)
उत्तर प्रदेशात २०१७ पेक्षा समाजवादी पार्टीला जास्त जागा मिळाल्या. १२५ जागांमधील अनेक सिटांवर सपाच्या उमेदवारांनी बाजी मारली. अखिलेश यादव यांनी स्वत: करहल या मदतारसंघात विजय मिळवत विद्यमान मंत्र्यांचा पराभव केला. यानंतर अखिलेश यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढण्यासाठी ट्वीट केलंय. 'उत्तर प्रदेश की जनता को हमारी सीटें ढाई गुनी व मत प्रतिशत डेढ़ गुना बढ़ाने के लिए हार्दिक धन्यवाद!, असं त्यांनी म्हटलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.